लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा जीवन प्रवास ऐकताना अनेकांना अश्रू अनावर
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेड राजा ( प्रतीक सोनपसारे )
सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथे स्वर्गीय लोकनेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त अविनाश भारती यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम 11/ 11/2022 रोजी पार पडला त्या ठिकाणी अविनाश भारती यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संघर्षाबद्दल त्यांच्या जीवन यात्रा ऐकताना अनेकांना अश्रू अनावर झाले.
अविनाश भारती बोलताना म्हणाले "वंजारी समाज हा फक्त ऊस तोड कामगार म्हणून ओळखला जायचा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजाला प्रवाहात आणायचं काम केलं. एवढ्यावरच थांबले नाही तर आरक्षण मिळवून दिला. ओबीसी समाजाची जनगणना केली. ते नेहमी सांगायचे शिका संघटित व्हा असा नेहमी नारा द्यायचे त्यामुळे चांगल्या चांगल्या पदावरती वंजारी समाजाचा अनेक अधिकारी आहेत." अनेक व्याख्यानाच्या माध्यमातून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबा बद्दल त्यांच्या संघर्षाबद्दल बरेचसे आठवणी त्यांनी सांगितल्या.
या कार्यक्रमावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान गायकवाड, भाजपचे प्रवक्ते विनोद भाऊ वाघ, जालना येथे कार्यरत असलेले पीएसआय बाबुराव नागरे साहेब, प्रविनभाऊ गिते, अंकुर भाऊ देशपांडे, उध्दव भाऊ लंबे, डॉ. जाधव साहेब, गावातील भाजपा युवा मोर्चा ता.उपाध्यक्ष बाबासाहेब कुटे, समाधान वाघ, खुशाल नागरे सर, पत्रकार संतोष दराडे, सामाजिक कार्यकर्ता भारत वाघमारे, नामदेव कुटे, गणेश कुटे, रमेश नागरे, रामप्रसाद कुटे, रवींद्र भालेकर, ज्ञानेश्वर चव्हाण, दत्तू महाराज भुसारी, आदी मान्यवर तसेच इतर ग्रामस्थ मंडळी व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा