विठ्ठल - रुक्मिणी मंदिर परिसरात होणारे कॉरिडॉर बाबत चुकीच्या अफवा पसरवू नये
शिवशाही वृत्तसेवा सोलापूर
पंढरपूर येथील श्री. विठ्ठल - रुक्मिणी मंदिर परिसरात होणारे कॉरिडॉर हा कोणाला उध्वस्त करणार नाही. कोणाचीही घरे तोडणार नाही. मंदिर परिसरातील मठ, मंदिर, परंपरा कायम ठेवणार आहोत. कोणीही कॉरिडॉर बाबत चुकीच्या अफवा पसरवू नये. यातून कोणाचेही नुकसान होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.
रविवारी सोलापुरात राष्ट्रीय गुरव महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाअधिवेशन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील त्यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात तीनशे कोटीचा कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. यातून रस्ते, मठ, पंढरपूर शहरातील गल्ल्या, घाट, लहान मोठी मंदिरे, चंद्रभागा तीराचा विकास, विठ्ठल मंदिर हे पालखी मार्गवरील विकासाकडे कॉरिडॉर निर्माण करताना खास लक्ष देण्यात येणार आहे.
मात्र मागील काही दिवसापासून या कॉरिडाॅरल बाधितांकडून विविध पक्षाकडून विरोध होताना दिसून येत आहे. आंदोलने, मोर्चे, निर्देशने होत आहेत. मात्र काही झाले तरी हा कॉरिडॉर होणारच आहे. यातून कोणाचेही नुकसान होणार नाही आणि आम्ही ते करणारही नाही असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सगळ्यांना सोबत घेऊन हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे फडणवीस आणि शेवटी सांगितले.
पंतप्रधानाचेही शिक्कामोर्तबपंढरपूर कॉरिडाॅरला विरोध होत असतानाच रविवारी नागपूर येथील समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंढरपूरच्या कॉरिडॉर बाबत भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या कॉरिडॉर बाबत आता अंतिम निर्णय झाल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा कॉरिडाॅर होणार हे उपमुख्यमंत्र्याच्या भाषणानंतर सिद्ध झाले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा