कुंटुर येथील स्मशान भुमीचे काम रखडले
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटूरकर )
नायगाव तालुक्यातील कुंटूर हे गाव जिल्हा परिषद सर्कलचे गाव असून ह्या गावाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 5681 आहे.
माजी खासदार माजी मंत्री गंगाधररावजी कुंटूरकर यांचा या परिसरासहित जिल्ह्याच्या अध्यक्षपदास वरही मोठा दबदबा होता . कुंटूर सर्कलच्या सर्व राजकीय घडामोडीचा एकच आधारस्तंभ व गेल्या पन्नास वर्षापासून राजकीय सत्ता व कुंटूर परिसरावर असणाऱ्या माजी मंत्री कै. गंगाधर रावजी कुंटूरकर यांच्या गावामध्येच सार्वजनिक समशानभूमीची वाणवा दिसून येत आहे . याला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याची नागरिकांतून स्पष्ट चर्चा होत आहे . गंगाधर रावजी कुंटूरकर यांचे राजकारण म्हणजे बेधडकपणा व योग्यकामे असे तसेच बिनधास्त बोलून गरीबापासून ते श्रीमंताच्या त्यांनी कामे केले त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत असो सोसायटी पासून पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच माजी खासदार पासून ते मंत्र्यापर्यंत त्यांनी मजल मारली त्यामुळे त्यांना सर्व महाराष्ट्रातील एक कणखर व दमदार व्यक्तिमत्व व राजकारणाचे धुरंधर म्हणून ओळखले जातात .
मात्र त्यांच्या गावांमध्ये मातंग समाज बोध समाज व इतर एससी असो या सर्व जाती धर्मातील लोकांच्या जीवनामध्ये अंतिम क्षण म्हणजे समशानभूमीची जागा उपलब्ध त्याचबरोबर सार्वजनिक समशानभूमीचे शेड असो अशा गोष्टीची वाणवा आजपर्यंत कायम राहत आहे. त्यामुळे काही पाहुणे जेव्हा अंत्यविधीसाठी गावांमध्ये येतात तेव्हा एकच चर्चा करतात की गंगाधररावजी कुंटूरकर सर्व लोकांना परिचित असून त्यांच्या गावांमध्ये जर अशी अवस्था असेल तर हे कुठे चुकते हे मात्र कळणे शक्य नाही .
असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे गावातील लोकांचे मन हे एक क्षण होते की सर्व गोष्टी संपन्न असून जिल्ह्याच्या खासदार पदापर्यंत मजल मारणाऱ्या खासदार यांच्या गावातच जर नागरिकांना अंत्यविधीसाठी अनेक अडचणी सोसाव्या लागतात याला स्थानिक ग्रामपंचायत जबाबदार आहे का ? वरिष्ठ अधिकारी याकडे पाहणे योग्य राहील. देशमुख घराण्याची परंपरा 40 वर्षे कुंटूर सर्कलच्या 19 गावांमध्ये सत्ता स्थापन राहिली आहे. त्यामुळे सर्व स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासन या वरिष्ठ हातामध्ये असूनही कुंटुरगावाची अशी अवकाळा का होते असे नागरिकांतून चर्चा केल्यानंतर हे कोड येऊन उलगडणारे असल्यामुळे गावातील लोकांचे म्हणणे आहे . की आपल्या गावामध्ये समशानभूमी होणे कुठे अडचण येते याकडे वेळीच लक्ष देऊन लवकर शमसान भूमी हवी अशी चर्चाही काही अंतविधिला आलेल्या नागरिकांनी केली.
याकडे ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर याकडे लक्ष देऊन काय उपाययोजना करतील हे मात्र पाहणे योग्य राहील अशी चर्चा आहे . परिसरातील नागरिकांनी ही कुंटूर येते अंत्यविधीसाठी आल्याने एकच चर्चा रंगली होती .
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा