पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात तसेच बुलढाणा जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतीक सोनपसारे)
महाराष्ट्र राज्य सहकारमंत्री श्री. अतुलजी सावे उद्या बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून उद्या सकाळी 11 वाजता मलकापूर येथील पांडव मंगल कार्यालयावर आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्यानंतर 11:30 वाजता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त आयोजित सेवा सप्ताहा निमित्त विविध शासकीय योजनांच्या शिबिराला ते उपस्थित राहणार आहेत
दुपारी 12 वाजता मलकापूर शहरातील कोठारी महाविद्यालयात आयोजित माळी समाज वधू वर परिचय संमेलनाला त्यांची उपस्थिती राहणार आहे दुपारी 1 वाजता पांडव मंगल कार्यालयात त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे . त्यानंतर त्यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच तथा सदस्य यांचा सत्कार करण्यात येणार आहे व सर्व कार्यक्रम आटोपून झाल्यावर सायंकाळी ते नागपूरकडे रवाना होतील.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा