जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नावीन्यपूर्ण सादरीकरण
शिवशाही वृत्तसेवा नांदेड (शिवाजी कुंटूरकर ) जिल्हा प्रतिनिधी
नांदेड येथील नामांकित शाळा ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल निळारोड नांदेड यांनी ब्लू बेल्स शाळा नायगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सोळाव्या आंतरशालेय जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नावीन्यपूर्ण सादरीकरण करीत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. शाळेतील ईयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. क्षितिजा बोडके या विद्यार्थिनीने योग्य आचरणातून योग्य समाज घडतो ,योग्य आचारसंहिता व नैतिकमूल्ये मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणतात आणि शिस्तीतूनचं नैतिकता विकसित होते यावर आपले मतप्रदर्शन करीत स्पर्धेत यश संपादन केले.
सदरील स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील व तेलंगणातील वीस शाळांनी सहभाग घेतला होता. पोस्टर मेकिंग स्पर्धेत याच शाळेतील ईयत्ता दहावीची शगुन मलाकदार या विद्यार्थिनीने विशेष प्रावीण्य मिळविले. ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, प्रा.रवींद्र चव्हाण ब्लू बेल्स शाळेचे संचालक हरीबाबू यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूलचे संचालक तथा अध्यक्ष श्रीनिवास धावरशेट्टी , सचिव सौ. उमादेवी धावरशेट्टी, मुख्याध्यापक सुबोजीत घोष व ईतर शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना सौ.आशिया खान व सौ. अश्विनी भोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा