जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्ष वाढीसाठी निर्णय
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा ( प्रतिक सोनपसारे )
बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार श्री. संजय गायकवाड यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीचे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांनी दिले आहे .
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. वादग्रस्त आणि वादळी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कोणत्याही मुद्द्यावर अतिशय आक्रमकपणे आपली मते मांडणारे आमदार संजय गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये फायर ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात बाळासाहेब यांची शिवसेना पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने केला आहे पक्षाला जिल्ह्यात मिळालेल्या या यशाचे फलित म्हणून पक्षाने बुलढाणा जिल्ह्यात पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी व पक्ष वाढवण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांच्यावर ही जबाबदारी दिली असल्याचे दिसते.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर संभाजीनगर आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यावर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे भव्य सभा व शेतकरी मेळावा घेतला होता तसेच महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातूनही सुषमा अंधारे यांनी या भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत तरीही बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने जिल्ह्यात चांगली कामगिरी केल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण असून या उत्साहाचा फायदा पक्ष वाढीसाठी करावा या हेतूने आमदार संजय गायकवाड यांच्याकडे जिल्हा संपर्कप्रमुख हे पद दिली असल्याने बुलढाणा जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शिवसैनिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा