भाजपा जिल्हाध्यक्ष खोटे दावे करत असल्याचा आरोप
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा ( प्रतीक सोनपसारे )
नुकत्याच राज्यात सात हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया पार पडली निकालानंतर राज्यात भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा जिंकत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असल्याचे सिद्ध केले . तर बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाने ही चांगली कामगिरी करत आठशेच्या आसपास जागा महाराष्ट्र जिंकल्या आहेत
दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला होता तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जात होते. आता माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी या दाव्याला छेद देत हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सरासर खोटे बोलत असून जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या 98 पेक्षा जास्त जागा निवडून आल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशाचे, राज्याचे, इतकेच नव्हे तर जिल्ह्याचे हे राजकारण ढवळून निघाले असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सामान्य माणूस पुन्हा एकदा काँग्रेसला जोडला जात आहे त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळाले असून बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीची 98 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर सत्ता आली आहे. भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यात 18 पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत मात्र भाजप कडून खोटे दावे केले जात असून जनतेची दिशाभूल केली जात आहे असेही माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सांगितले आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा