निंबा शाळेतील प्रकार , कारवाईची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, गोंदिया
गोरेगाव पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या निंबा येथील जिल्ह परिषद पूर्व माध्यमिक शाळेत कार्यरत शिक्षक जी. आर. मरसकोल्हे हे शाळेत चक्क दारू पिऊन आले . झिंगतच त्यांनी वर्गखोलीत प्रवेश केला . त्यांची अवस्था बघून विद्यार्थी घाबरले . त्यांनी याची माहिती मुख्याध्यापक नंदेश्वर व पालकांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार माहीत होताच त्यांनी शाळा गाठली . यावेळी शिक्षक मरसकोल्हे हे वर्गखोलीत झोपून होते.
शिक्षक तथा कर्मचाऱ्यांनी दारुड्या शिक्षकाला गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सरपंच वर्षा पटेल, पंचायत समिती सदस्य राकेश पंधरे , गावकरी यांनी गोरेगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली . गावकरी व पालकांनी तीव्र संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.
तीन वर्षा पूर्वी निलंबित
शिक्षक मरसकोल्हे याना देवरी पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना ऑगस्ट २०११ मध्ये निलंबित करण्यात आले होते. शिक्षण आयुक्तांकडे कार्यवाही संदर्भातील प्रकरण प्रलंबित आहे. तसेच मरसकोल्हे यांच्यावर कारवाईसाठी जून व सप्टेंबर २०२२ मध्ये प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे गोरेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिरसाठ यांनी सांगितले .
निंबा शाळेत शिक्षक दारू पिऊन असल्याची माहिती मिळाली. गटशिक्षणाधिकारी याना चौकशी करण्याची सूचना दिली आहे. अहवाल प्राप्त होताच कारवाई करणार आहेत.डॉ. महेंद्र गजभियेशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. गोंदिया
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा