चैत्यभूमी प्रतिकृती येथे बाबासाहेबांचा सुवर्ण आस्तिकलश सुपूर्द
शिवशाही वृत्तसेवा, इचलकरंजी
संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने हुपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तसेच तेथील चैत्यभूमी प्रतिकृती येथे डॉ. बाबासाहेबांच्या अस्थी ठेवण्यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याचे माजी चेअरमन व तज्ञ संचालक आमदार प्रकाशआण्णा आवाडे व केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते सुवर्णकलश डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सेवा समिती व समस्त बौद्ध समाजाकडे सुपूर्त करण्यात आला
यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर, नगराध्यक्षा जयश्री गाट, उपनगराध्यक्ष सुरज बेडगे, तालुका पं. सदस्य किरण कांबळे, ताराराणी हुपरी अध्यक्ष आण्णासाहेब शेंडूरे, पंकज गिरी (PSI), कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब गोटखिंडे, माजी जि.प.स. विलास खानविलकर, मंगलराव माळगे, डॉ. सुभाष मधाळे, विद्याधर कांबळे, आनंदराव कांबळे, संतोष कांबळे, बांधकाम सभापती अनिता मधाळे, शितल कांबळे, नगरसेविका माया रावण, लक्ष्मी साळुंखे, डॉ. स्वप्निल हुपरीकर, गणेश वाईगडे, दौलत पाटील, भरत लठ्ठे, प्रकाशराव जाधव, मनोहर सुतार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा