maharashtra day, workers day, shivshahi news,

समाजाच्या आरोग्याची काळजी असलेला पत्रकार हा समाजाचा आरसा होय - पोलिस उपअधिक्षक अर्चित चांडक

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर

Journalist health checkup camp,  All India Marathi Press Conference, naigao, nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटूरकर )

     सामाजिक बांधिलकी जोपासीत व समाजाच्या आरोग्याची काळजी घेत कार्यरत असलेला पत्रकार हा समाजाचा आरसा असून त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत राबविलेली तपासणी स्तुत्य उपक्रम असल्याचे मत मांडतांनाच भविष्यात पत्रकार व पोलीस यांच्या एकत्रित आरोग्य तपासणी शिबीर व समन्वयातून उपक्रमासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक अर्चित चांडक यांनी दिली.     

 

    मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणेच यंदाही पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर घ्यावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर,विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे,अनिल महाजन यांनी केले होते.त्या अनुषंगानेच परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी,मा.विभागीय सचिव प्रकाश कांबळे,माजी जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर व माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा,तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमशील नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने दि.३ डिसेंबर २०२२ रोजी अष्टविनायक हाॅस्पीटल, नायगांव बा.येथे आयोजित पत्रकार आरोग्य तपासणी शिबीरप्रसंगी अध्यक्षीय समरोपात ते बोलत होते. 

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपअधिक्षक अर्चित चांडक तर, उदघाटक म्हणून नायगाव नगरपंचायतचे नगरसेवक युवा नेते पंकज पाटील चव्हाण यांची उपस्थिती होती.त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून नायगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डाॅ.एच.आर.गुंटूरकर, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर,डॉ. साईबाबा अंकुशकर,डॉ.श्रीकांत भोसकर, डॉ.गुलाबराव वडजे, तालुकाध्यक्ष गजानन चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष प्रकाश हनमंते यांनी केले.तर, सुत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांनी केले.यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर, डाॅ.एच.आर.गुंटूरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

    पूढे बोलतांना अध्यक्ष पोलीस उपअधिक्षक अर्चित चांडक म्हणाले की,समाजाचा आरसा असलेला पत्रकार व पोलीस आणि जनता समन्वयाने एकत्र आल्यासच समाज घडतो. त्यामूळे आपणांस एकत्रित काम करण्याची गरज आहे. अष्टविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. साईबाबा अंकुशकर यांनी येणाऱ्या काळातही पत्रकारांच्या कुठल्याही अडचणीला मी सदैव कर्तव्यतत्पर असल्याची ग्वाही दिली.   

 

 नायगांवसह कुंटूर,बरबडा मांजरम,नरसी, शंकरनगर परिसरातील ग्रामीण भागातून आलेल्या तब्बल ५९ पत्रकारांच्या आरोग्य तपासणीमध्ये शुगर,बीपी, इसीजी आदी तपासण्या डॉ. साईबाबा अंकुशकर,डॉ.गंगाधर बाबर,डॉ.मजगे व बालाजी लोलमवाड,शिवशक्ती इंगळे, आदी कर्मचाऱ्यांनी करित विशेष परिश्रम घेतले.

   यावेळी ज्येष्ठ पत्रकार विकास भुरे,सहसचिव रामप्रसाद चन्नावार,गोविंद नरसीकर, कैलास तेलंग,पंडित वाघमारे, रामराव ढगे,किरण वाघमारे, शेषेराव कंधारे,श्याम गायकवाड, परमेश्वर जाधव,भगवान शेवाळे, यशवंत मोरे,मनोहर मोरे, बालासाहेब शर्मा,आनंदराव सूर्यवंशी,धम्मा भेदे,हनमंत वाडेकर,तानाजी शेळगावकर, मारोती बारदेवाड,साहेबराव धसाङे.शिवाजी कुंटूरकर,अनिल कांबळे,प्रकाश महिपाळे,शेषेराव बेलकर, बालाजी हनमंते,दिगंबर झुंबाडे, हनमंत चंदनकर,धम्मदीप भद्रे, बालाजी रानडे,आनंदराव डाकोरे,अंकुश देगावकर तसेच नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !