संस्थापक अध्यक्ष कडुभाऊ काळे, हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या हस्ते प्रकाशन
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा ( विष्णू मुंगसे )
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या देडगाव शाखेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडुभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी युवक नेते चंद्रकांत मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, प्रगतशील शेतकरी चंद्रभान कदम, बालाजी पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे, माजी सरपंच दत्ता मुंगसे, माजी चेअरमन योसेफ हिवाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोपान मुंगसे, काळूराम गोयकर, गोपीनाथ ससाणे, प्रेमचंद हिवाळे टेलर, शांतिकांत नांगरे, एकनाथ बनसोडे ,हरिभाऊ मुंगसे, गंगाराम तांबे, विजयकुमार वांढेकर, उत्तम तांबे, जालिंदर लाडके, अरूण वांढेकर, किशोर पुंड, शिवाजी मुंगसे, नागेबाबा शाखेचे शाखाधिकारी पांडुरंग एडके, अमोल आडवणे, सुलभाताई नांगरे, संस्थेचे सभासद व खातेदार आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा