तपास मात्र गुलदस्त्यात ; संबंधीतास अटक नाही.
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटूरकर )
तालुक्यातील विजवितरण कंपनीच्या निष्काळजी पणामुळे डीपीचे वायर तुटून रस्त्यावर पडल्यामुळे विजेचा धक्का लागून वंजारवाडी येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला असल्याने नायगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश दंडगव्हाण, लाइनमन रामेश्वर किशन पांचाळ यांच्यावर कारवाई करून अटक करण्याची मागणी शिवाजी यादव इबीतदार कुंटूरकर यांनी उपमुख्यमंत्री ,पालकमंत्री ,जिल्हाधिकारी यांना एका निदानाद्वारे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की नायगाव तालुक्यातील वंजारवाडी येथील रहिवासी असलेले मयत संभाजी विठ्ठल जाधव वय ४७ वर्ष हे दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान स्वछांलयास जात असताना विजवितरण कंपनीच्या निष्काळजी पणामुळे डीपीचे वायर तुटून रस्त्यावर पडल्यामुळे विजेचा धक्का लागून वंजारवाडी येथील तरुणाचा मृत्यू होऊन बरेच दिवस झाले मात्र तपास गुलदस्त्यातच असून आतापर्यंत एकालाही अटक करण्यात आले नाही.
म्हणून संभाजी जाधव यांच्या मृत्यूस असलेले नायगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश दंडगव्हाण, लाइनमन रामेश्वर किशन पांचाळ यांना जबाबदार धरून त्यांचेवर तात्काळ कारवाई करून सबंधित मयताच्या कुटुंबास आर्थिक मदत उपलब्ध करून देऊन मयताच्या कुटुंबास आधार द्यावा. अशी मागणी शिवाजी यादव इबीतदार कुंटूरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पालकमंत्री गिरीश महाजन ,जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा