महापरिनिर्वाण दिनानिमित्त नरसी येथे ६ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (शिवाजी कुंटूरकर)
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नरसी येथे फुले शाहू आंबेडकर क्रांती मंचावतीने दिनांक २६ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नरसी येथील सरपंच गजानन भिलवंडे तर उद्घाटक म्हणून रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे , माजी शिक्षण सभापती शिवराज पा. होटाळकर , तलाठी संघटचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, तलाठी टी.डी.बामणीकर ,माजी जि.प.सदस्य, लक्ष्मणराव ठक्करवाड ,जि. प.सदस्य माणिकराव दादा लोहगावे , काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय आप्पा बेळगे, संभाजी पाटील भिलवंडे, काँग्रेस बिलोली तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील , शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र पा. भिलवंडे , कृउबा.समितीचे संचालक रवी पाटील खतगावकर,
प्रताप जोगळेकर, मे.रामजी बाबा कंट्रक्शनचे माधव दादा वाघमारे, मे शांताई लक्ष्मण पेट्रोलियमचे गौतम कांबळे , काँग्रेसचे अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष इसाक भाई सय्यद, सरपंच आकाश कोकणे, पोलीस पाटील इब्राहिम पटेल, एन.डी नरसीकर, डॉ.संतोष मोरे , डि.के हानवटे , चेअरमन मारुती भिलवंडे , तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर वडगावे , यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन फुले शाहू आंबेडकर क्रांती मंचावतीने करण्यात येत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा