जनतेतून आमदार राजेश पवार यांचे कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (शिवाजी कुंटूरकर)
आमदार राजेश पवार यांच्या प्रयत्नातून नायगाव तालुक्यात सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने सी.सी.रस्त्यासाठी निधीचा वर्षाव सातत्यपूर्ण सुरूच असून ग्रामविकास मंत्रालय लेखाशीर्षक २५/१५ अंतर्गत नायगाव तालुक्यातील १९ गावाच्या विकास कामांसाठी तब्बल २ कोटी १२ लक्ष रुपये निधी खेचून आणल्यामुळे आता आमच्या गावातला रस्ता मजबूत होणार आहे. म्हणून आमदार राजेश पवार यांच्या असामान्य कार्यपद्धतीची पोचपावती मिळत असून लोकांमध्ये अतिशय समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.नायगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आ.राजेश पवार यांनी तालुक्यातील १९ गावासाठी तब्बल दोन कोटी बारा लक्ष रुपयांचा भरीव असा निधी उपलब्ध करून दिला आहे.
निधी मिळालेल्या गावाची नावे खालील प्रमाणे
मांजरम १६ लक्ष रुपये,गडगा २० लक्ष ,केदारवडगाव ८ लक्ष , टेंभुर्णी १६ लक्ष ,कोलंबी ८ लक्ष ,नावंदी ८ लक्ष ,मोकासदरा ४ लक्ष, रातोळी ४ लक्ष , रातोळी कॅम्प ४ लक्ष, कार्ला / माहेगाव २४ लक्ष, बरबडा १६ लक्ष, कहाळा (खु) २० लक्ष, कहाळा (बु) १२ लक्ष , रूई (बु) ८ लक्ष , रूई (खु) ८ लक्ष ,मनुर (त.ब.) ८ लक्ष ,वजिरगाव ८ लक्ष , इज्जतगाव १२ लक्ष , टाकळी (त.ब.) ८ लक्ष असा एकूण दोन कोटी बारा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याने नायगाव तालुक्यातील जनतेतून आमदार राजेश पवार यांचे कौतुक केल्या जात आहे.
कुंटूर येथे दिनांक ४ जून २०२२ रोजी शेळगाव ते कुंटूर या महामार्गाच्या रस्त्याच्या नामफलकाचे अनावरण करून नायगाव विधानसभा मतदार संघाचे कर्तबगार आमदार राजेश पवार यांनी कुंटूर - बरबडा सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून दिलेल्या २४.१४ कोटी रुपये निधीच्या विविध विकासकामाचे भूमिपूजन आ. राजेश पवार ,पुनमताई पवार , राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन केलेल्या रस्त्याचे काम पूर्णतत्वाकडे जात आहे कांही महिन्याचा कालावधी उलटला नाही मात्र आ. राजेश पवार यांनी नायगाव विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्याचा विडाच उचलला असून त्याअनुषंगाने अजून २ कोटी १२ लाख रुपयाच्या निधी खेचून आणून नायगाव मतदारसंघात विकासाची गंगाच दारी आणली आहे.
विकासाची गंगा आणली दारीआमदार राजेश पवार यांनी नायगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्याचा विडा उचलला असून आ.पवार यांनी गेल्या दोन तीन वर्षांपासून करोडो रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन नायगाव तालुक्यातील अनेक गावातील सीसी रस्त्याचे व तालुक्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे काम विकासाची गंगाच त्यांनी दरी आणली असल्याने माजी जिप. सदस्य तथा सोसायटी चे चेअरमन सूर्याजी पाटील चाडकर यांनी आमदार राजेश पवार यांचे अभिनंदन केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा