आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड. ( मिलिंद कुमार लांडगे )
पळशी बु येथील हरी सूर्यभान नरवडे (५०) हे बेपत्ता होते. यांचा मृतदेह शनिवारी दिनांक २ डिसेंबर रोजी अंजना पळशी मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात मिळून आला. हरी सूर्यभान नरवडे हे पिशोर येथून कामावरुन गुरुवार रोजी सायंकाळी घरी पळशी बु येथे जाण्यासाठी निघाले. परंतु ते घरी न आल्याने नातेवाइकांनी शोधाशोध घेतला त्यांचा मोबाईल बंद होता व कालव्या जवळ आढळून आला होता.नातेवाईकांनी शोध घेतला मात्र यश आले नाही.
शनिवारी सकाळी पैठण येथील ऑल महाराष्ट्र अंडर वॉटर सर्विसचे खाजगी जवान कृष्णा आगळे, एकनाथ वाघ, गोकुळ आगळे याना पचारण करण्यात आले. त्यांनी त्यांचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढ़ला. पिशोर पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद करून पिशोर ग्रामीण रुग्णालय त्यांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. काही दिवसांपासुन तणावात असल्याने हरी नरवडे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. हरी नरवडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात पळशी बु येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत नरवडे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली असुन सहा. फौजदार कदीर पटेल पुढ़ील तपास करित आहेत
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा