स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आरोपींच्या मुसक्या
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (मिलिंदकुमार लांडगे)
औराळा ता. कन्नड जि. औरंगाबाद येथील तरुण सागर संतोष जैस्वाल (वय २१ वर्ष) हा दिनांक २०/११/२०२२ रोजी नेहमीप्रमाणे घरी आला नाही म्हणून त्याचे हॉटेल व्यावसायिक असलेले चुलते विनोद धनुलाल जैस्वाल यांनी पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण येथे फिर्याद दिली. त्याबाबत पोलीस ठाणे देवगांव रंगारी येथे दिनांक २१/११/२०२२ रोजी तो बेपत्ता असल्याबाबत मिसींग दाखल करण्यांत आली होती. दरम्यान त्याचे काका व नातेवाईक त्याचा शोध घेत असतांना दिनांक ०१/१२/२०२२ दुपारी दोन वाजेच्या सुमारास पेडकवाडी येथील पोलीस पाटील आसाराम शंकर कलाल यांचेकडून त्यांना माहिती मिळाली की, पेडकवाडी शिवारातील पेडकवाडी ते कोळवाडी जाणारे रोडवरील पेडकवाडी घाटात म्हसोबा देवस्थानाजवळील पुलाच्या पाईपमध्ये एक पुरुष जातीचे प्रेत साडी व प्लास्टीकच्या कव्हरमध्ये गुंडाळून टाकलेले आहे, अशी माहिती विंनोद जैस्वाल यांनी तेथे जाऊन खात्री केली असता सदरचे प्रेत हे सागर संतोष जैस्वाल याचेच असल्याचे आढळून आले,त्यामुळे विनोद जैस्वाल यांनी कोणी तरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पुतण्या सागर संतोष जैस्वाल याला जिवे ठार मारले आहे. अशी तक्रार पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण येथेदिली त्यांच्या फिर्यादीवरून गुरनं २५१ / २०२२ कलम ३०२, २०१ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असतांना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रीक विश्लेषणा आधारे खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा पंढरीनाथ परसराम वाघचौरे, काकासाहेब परसराम वाघचौरे, (दोघे रा. धनगरवाडी, औराळा ता. कन्नड जि. औरंगाबाद) दिनेश उर्फ पप्पु संताराम साळूंके (रा. कविटखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद) यांनी पैशाच्या देण्या घेण्याच्या वादावरुन केलेला आहे.
त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद आरोपींचा शोध घेतला असता आरोपी पंढरीनाथ परसराम वाघचारे (वय २८), काकासाहेब परसराम वाघचौरे (वय ३४), दिनेश उर्फ पप्पु संताराम साळूंके (वय २२) यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, मयत सागर जैस्वाल याच्याकडून पंढरीनाथ वाघचौरे व दिनेश उर्फ पप्पु साळूंके यांनी हात उसने पैसे घेतलेले होते. मयत सागर जैस्वाल हा नेहमी त्यांच्याकडे चार चौघात उसनवार घेतलेल्या पैशांची मागणी करुन त्यांचा अपमान करीत होता. त्यामुळे त्यांनी सागर जैस्वाल यास पैसे घेण्यासाठी पेडकवाडी शिवारात बोलाविले व तेथे त्यांनी त्याचा लोखंडी हातोडी व दगडाने डोक्यात मारुन त्यास जिवे ठार मारुन त्याचे प्रेत पेडकवाडी घाटातील पाईपमध्ये टाकून दिले व त्याचे गळ्यातील सोन्याची चैन, हातातील अंगठया व कानातील बाळी काढून घेतली अशी कबुली दिली. त्यानंतर नमुद आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन सदर गुन्हयाचे पुढील तपासकामी पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण यांचे ताब्यात दिले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण हे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि विजय जाधव, हवालदार नागझरे, संजय घुगे, पो.नाईक वाल्मीक निकम, गणेश गांगवे, नरेंद्र खंदारे, उमेश बकले पोकों योगेश तरमाळे, जिवन घोलप तसेच पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण चे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, पोउपनि सागरसिंग राजपुत, पोह कैलास करवंदे, बाबासाहेब धनुरे यांनी केली आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा