काही भाविकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
पंढरपूर येथे दररोज अनेक भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येत असतात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले भाविक चंद्रभागेत स्नान करतात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करतात त्यातले बरेचसे भावी पंढरपुरात मुक्कामाही करतात
मंगळवार दिनांक 6 डिसेंबर रोजी असाच एक भाविकांचा समूह पंढरपूरला आल्यानंतर त्या भाविकांनी नदीकाठी असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जेवण केले. जेवणानंतर तीच भाविकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना पंढरपुरातील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले त्यातील काही भाविकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते
ही घटना घडतात मंदिर समितीचे अधिकारी नगरपालिकेचे अधिकारी आरोग्य विभागाचे अधिकारी सतर्क झाले. ही बाब सर्व प्रशासकीय स्तरावरून गांभीर्याने घेतली असून अन्न व औषधे प्रशासन खात्याचे अधिकारी देखील पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंढरपूर शहर पोलीस घटनेचा तपास करत असून नेमका काय प्रकार आहे याबाबत विविध खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत तपास करत आहेत.
पंढरपूरला रोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे पंढरपुरात मिळणाऱ्या खाद्यान्नाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नियमितपणे तपासणी व्हावी तसेच स्वच्छतेचे आणि आरोग्याचे मापदंड काटेकोरपणे पालन व्हावे अशी मागणी भाविकांबरोबरच स्थानिकांकडूनही करण्यात येत आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा