maharashtra day, workers day, shivshahi news,

फसवणूकप्रकरणी रणजीत सिंह शिंदे सह सात जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढण्याची तक्रार

son fo mla babanrao shinde, Ranjit Singh Shinde, case of fraud, madha, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा बार्शी

शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी इंडियन शुगर कारखान्याचे चेअरमन रणजीत सिंह शिंदे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्या. एन. एस. सबनीस यांनी दिले आहेत. चेअरमन रंजीत शिंदे, व्यवस्थापक कैलास मते, विजयकुमार धनवे, औदुंबर कदम, सुहास मुरकुटे अन्य दोघे अशा सात जणांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले.

याबाबत तालुक्यातील उपळे दुमला येथील शेतकरी मिलिंद नामदेव काळे यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. काळे यांच्या फिर्यादीनुसार, काळे हे इंडियन शुगरच्या तुर्क पिंपरी कारखान्याचे २०१४ पासून सभासद आहेत. सुहास आशोक बुरगुटे यास 2014 मध्ये ठिबक सिंचन कर्ज प्रकरणात फिर्यादी जामीन झालेले नसताना कारखान्याचे चेअरमन रणजीत सिंह शिंदे व जनरल मॅनेजर कैलास मते यांनी कारखान्याच्या वतीने आरबीएल बँक शाखा अकलूज मार्फत ठिबक सिंचन संच कर्ज प्रकरण शेतकऱ्यांना दिले.

त्याप्रमाणे 2014  - 2015 वर्षांमध्ये कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, जनरल मॅनेजर कैलास मते, कारखान्याचे तत्कालीन बीट प्रमुख विजयकुमार धनवे, कारखान्याचे तत्कालीन ॲग्री ऑफिसर औदुंबर कदम, आरबीएल बँकेच्या अकलूज शाखेचे तत्कालीन सेटलमेंट ऑफिसर व तत्कालीन मॅनेजर यांनी सुहास अशोक बुरगुटे यांच्या नावाने 80 हजार रुपयांचे ठिबक सिंचन संच कर्ज मंजूर करून घेत कर्जाची रक्कम परस्पर उचलली, असे तक्रारीत म्हणले आहे.

कर्ज प्रकरण करताना मिलिंद काळे यांच्या ऐवजी त्रयस्थ इसम कर्ज प्रकरणी जामीनदार म्हणून उभा करून सह्या घेऊन ते प्रकरण मंजूर केले व ते कर्ज 2014 पासून थकीत ठेवले. याप्रकरणी काळे यांच्या वतीने अँड.आर. यु. वैद्य, अँड.के. पी.राऊत, अँड.एस.पी.शहा काम पाहत आहेत.

ऊस गाळपास घालूनही बिलाची रक्कम दिली नाही
2021- 2022 मधील ऊस बिलाची रक्कम तीन लाख 14 हजार 554 रुपये काळे यांना दिली नाही. काळे यांनी 156 टन 777 किलो ऊस या कारखान्यास गाळपासाठी घालूनही ती रक्कम कारखान्याने दिली नाही. यासाठी कारखान्या प्रशासनात फिर्यादी शेतकऱ्यांनी भेटून मागणी करूनही रक्कम देण्यास स्पष्ट नकार देऊन या उसाची रक्कम सुहास बुरगुटे यांच्या 80 हजार रुपये ठिबक सिंचन कर्ज थकीत पोटी जमा करून घेतल्याचे सांगण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याने त्यांनी न्यायालयात धावा घेतला. असे फिर्यादीत म्हटले आहे.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !