सरपंचासह दहा जागांसाठी दहाच अर्ज : एकमेव अर्ज घेतला मागे
शिवशाही वृत्तसेवा, बार्शी
बार्शी तालुक्यातील अतिसंवेदनशील ग्रामपंचायत आणि टोकाचे राजकीय मतभेद असलेल्या देवगाव ची पंचवर ग्रामपंचायत निवडणूक प्रथमच बिनविरोध झाली आहे.
देवगाव ग्रामपंचायत वर गेल्या पंचवीस वर्षापासून माझी पंचायत समिती सदस्य रामेश्वर मांजरे यांच्या गटाचे वर्चस्व आहे. ते पूर्वी माझी मंत्री दिलीप सोपल यांच्या गटात होते. मात्र गेल्या वर्षापासून ते आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटात दाखल झाले आहेत. पंचायत समितीचे माजी उपसभापती अविनाश मांजरे, रामेश्वर पाटील आदी मंडळी राजेंद्र राऊत यांच्या गटाचे काम पाहत आहेत. सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला होता.
मात्र नऊ सदस्यांसाठी दहा अर्ज दाखल झाले होते. योगेश मांजरे यांनी संदीप तुकाराम मांजरे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. दोन्ही गट आमदार राजेंद्र राऊत यांचे होते. मांजरे व पाटील यांनी मध्यस्थी करून ही तो एकही अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत सदस्यांसाठी नऊ जागा आणि नऊ अर्ज असे चित्र झाले आहे. तर सरपंच पदी फिरोज बडे मिया मुलानी यांची वर्णी लागणार हे आता निश्चित आहे. देवगावात आमदार राजेंद्र राऊत यांचे दोन गट आमने-सामने आल्याने यंदाही संवेदनशील ग्रामपंचायत बिनविरोध निघणार असे चित्र सुरुवातीपासूनच होते. मात्र, स्थानिक पातळीवरील मतभेद याचा अडसर होता. त्यातूनच योगेश मांजरे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, वरिष्ठांची भूमिका आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्या शब्दाचा मान ठेवत योगेश मांजरे यांनी माघार घेतली आहे.
" बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत ह्या बिनविरोध निघत आहेत. ही विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. गावात अशीच एकी राहिली तर लक्ष्मी ही टिकून राहते. त्यामुळे भविष्यात विकास कामात देवगावला झुकते माप मिळणार यामध्ये शंका नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत भांडणे तंटे हे ठरलेले असतात. त्यामुळे शेजारी असलेल्या गाडेगावासहदेवगाव ही बिनविरोध निघाल्याने विकास कामात कोणताही अडसर राहणार नाही.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा