maharashtra day, workers day, shivshahi news,

तन्जीम ए ईन्साफ च्या जिल्हाध्यक्षपदी रियाज शेख यांची निवड

कोषाध्यक्षपदी शेख आरीफ तर सहसचिवपदी सद्दाम पटेल 

All India Tanjim A Insaf, District Executive announced, nanded, maharashtra, shivshahi news,

नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूंरकर

    ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी शेख रियाज चांदपाशा कोषाध्यक्षपदी शेख आरीफ तर सहसचिव सद्दाम पटेल यांची निवड करण्यात आली.

         ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफचे प्रदेशाध्यक्ष एस.जी.शुत्तारी, महासचिव अशफाक सलामी यांच्या सूचनेनुसार माजी राष्ट्रीय सचिव फारूख अहमद,भाकपा नेते काॅ.प्रदिप नागापुरकर यांनी जिल्हा कार्यकारिणी घोषित केली.यावेळी आमेर अरसिल, मोहम्मद कासिम, ईशान खान, अब्दुल समी यांची उपस्थिती होती. यावेळी अल्पसंख्यांक समाजात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक समस्यांवर जनजागृती करणारी, व अन्यायाविरूद्ध लढा देणारी देशपातळीवरील एकमेव संगठन 'ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ' ची नांदेड जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. 

जिल्हाध्यक्ष पदी शेख रियाज चांदपाशा तर जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनिल सोनसळे, महासचिव वलियोद्दीन फारुखी बिलोली,हरपाल सिंग गुलाटी,जिल्हा समन्वयक इर्शाद पटेल देगलूर, जिल्हा उपाध्यक्ष शेख मलंग लोहा व म.मोईज धर्माबाद, मुख्य संघटक अब्दुल हकीम भोकर, सचिव शेख हुसेन रायवाडीकर,सहसचिव सद्दाम पटेल नरसीकर, कोषाध्यक्ष शेख आरिफ नायगाव, सह कोषाध्यक्ष हाफिज शेख असिमसाब कंधार, प्रसिध्दीप्रमुख मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सय्यद मुजीब अहमद मुदखेड, सय्यद नईम मुल्ला मुखेड, आदींची निवड करण्यात आली. याकार्यकारिणीचे मार्गदर्शक काॅ.प्रदिप नागापुरकर, काॅ. शेख गफारसाब सावरगावकर हे आहेत. आगामी काळात भारतीय संविधानानुसार देशात समता, बंधूता, सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठी प्रयत्न करून अल्पसंख्याक समाजावरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरूध्द जन आंदोलन उभारणार असल्याचा निर्धार नवनिर्वाचित कार्यकारिणीने केला आहे.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !