पंचशील ग्रहण आणि प्रतिमा पूजन करून महामानवास अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटूरकर )
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील बौद्ध विहारांमध्ये रमाबाई आंबेडकर महिला बचत गटाच्या वतीने सर्व महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वा समाज मंदिर कुंटुर येथे पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रमाबाई आंबेडकर महिला बचत गटाचे अध्यक्ष रेखाबाई अनिल कांबळे व सचिव ज्योती हनुमंते, कलुबाई गजभारे ,सुनिता हनुमंते, शशिकला हनुमंते, शोभाबाई गजभारे, धुरपत बाई सर्जे, मनीषा हनुमंते, अरुणा हांनमते, छाया हांनमते, यावेळी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह कुंटूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नाजी झुंजारे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा रविकांत हनमंत हे उपस्थित होते. रविकांत हणमंते सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवकार्याचा उलगडा केला,तसेच आजच्या काळात मातंग समाज बांधवांना मार्गदर्शन केले. या वेळी साठे नगर सभागृहाच्या बाजूस प्रमुख पाहुणे तसेच सुरेश जलबा वाघमारे यांच्या हस्ते बोधि वृक्ष लाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत वाघमारे ,दत्ता झुंजारे, अविनाश वाघमारे, लक्ष्मण जेथेवाड, रविकांत गायकवाड ,संतोष झुंजारे, विजय झुंजारे,जीवन वाघमारे ,रोहित वाघमारे,अमृत गायकवाड ,अविनाश झुंजारे,प्रकाश पेठवडजकर , बाबुराव गायकवाड , सुधीर वाघमारे, सुनिल वाघमारे , उद्घव झुंजारे इ नवयुवक उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा