दिव्यांगांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती
शिवशाही वृत्तसेवा, पुणे
दि. 8 डिसेंबर 2022 रोजी ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये मनोविकृतीशास्त्र विभाग, चिकित्सा मानसशास्त्र विभाग महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, बै.जी. शासकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या दिव्यांग संसाधन केंद्रामार्फत 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन तसेच 8 डिसेंबर बौद्धिक अक्षमता दिन या सप्ताहाचे औचित्य साधून दिव्यांग रुग्णांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहयोगी प्राध्यापक तथा मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर निशिकांत थोरात यांनी केले प्रस्ताविकामध्ये दिव्यांग संसाधन केंद्रामध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधांचा लाभ दिव्यांग बांधवांनी घेण्याचे आवाहन केले.
तसेच चिकित्सा मानसशास्त्र विभाग प्रमुख दीपिका पाटील यांनी दिव्यांग संसाधन केंद्रामध्ये मिळणाऱ्या सर्व योजनांविषयी माहिती दिली तसेच दिव्यांगांचे इतर प्रकार दृश्य आहेत परंतु बौद्धिक अक्षमता हा दिव्यांग प्रकार दृश्य नसल्यामुळे त्याविषयी पालकांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्येवरती मार्गदर्शन केले. पुणे महानगरपालिका समग्र शिक्षा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक योजनांची माहिती विशेष शिक्षिका श्रीमती वैशाली गायकवाड यांनी दिली ,विशेष शिक्षिका श्रीमती कुंदा शिंदे यांनी शीघ्र हस्तक्षेप व उपचार याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग खेड तालुकादिव्यांग कल्याण कक्ष अधिकारी श्री. एन. पी. कुलकर्णी यांनी दिव्यांगांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. हवेली दिव्यांग कल्याण कक्ष अधिकारी श्री. विनोद हाके यांनी दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या वैश्विक ओळखपत्र प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी दिव्यांगांसाठी मनोरंजनात्मक विविध खेळाचे आयोजन केले. या कार्यक्रमास मंचावर बारामती तालुका दिव्यांग कल्याण कक्ष अधिकारी श्री. संतोष खिलारे , मावळ तालुका कक्ष अधिकारी श्रीमती मेधा शिंदे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली गायकवाड तर आभार प्रदर्शन अधिव्याख्याता सायली वझे यांनी केले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा