बामणी येथील खंडोबाच्या यात्रेचा कुस्त्याच्या दंगलीने समारोप
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटूरकर )
कंधार तालुक्यातील बामणी ( पं.क ) येथे गेल्या २५ ते ३० वर्षापासून चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायाची यात्रा भरत असते. चंपाष्टमीच्या दिवशी खंडेरायाचे भक्त श्री खंडोजी पाटील कदम यांच्या निवासस्थानापासून खंडोबाच्या पालखीस प्रारंभ सकाळी नऊ वाजता करण्यात येत असतो. यावेळी खंडेरायाच्या पालखी समोर वारू खेळत खंडेरायाच्या पालखीला सुरुवात करण्यात येते ही खंडोबाची पालखी हनुमान मंदिर मार्गे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा ते खंडोबा मंदिर त्यानंतर पालखीचे मानकरी खंडोजी पाटील कदम यांच्या शेताकडे समाधी स्थळे तिथून त्यांच्या निवासस्थानी खंडोबाच्या पालखीचा समारोप केला जातो.
यावेळी सर्व गावातील व यात्रेकरूंना खंडोजी कदम यांच्या निवासस्थानी भरीत आणि रोडग्याच्या जेवणाचा स्वाद दिला जातो त्यानंतर दुपारी दोन वाजता बामणी येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री खंडोबा मंदिर परिसरामध्ये जंगी कुस्त्यांच्या सामना सुरू करण्यात येतो कुस्तीमध्ये सहभाग घेण्यासाठी नांदेड परभणी हिंगोली औरंगाबाद लातूर या जिल्ह्यातील पैलवान कुस्ती खेळण्यासाठी उपस्थित राहत असतात.
यावर्षी जी मानाची कुस्ती असते ही कुस्ती कै. बालाजी इरबा पाटील शिराळे यांच्या स्मरणार्थ १११११ रुपयाचे पारितोषिक ठेवण्यात आले होते. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी परमेश्वर जगताप व चाऊस पालमकर या पैलवानामध्ये कुस्तीची लढत लावण्यात आली होती यात प्रथम परमेश्वर जगताप या पैलवानाने मान मिळवत कै.बालाजी इरबा पाटील शिराळे यांच्या स्मरणार १११११ रुपये पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पंडित बालाजी पाटील शिराळे विक्रम पाटील शिराळे ( बामणीकर ) काशिनाथ शिराळे जयवंत वाघमारे सरपंच प्रतिनिधी परसराम तेलंग माजी तंटामुक्ती अध्यक्ष जयशिग पाटील कदम माजी सरपंच अंगद बंत्तलवाड रामचंद्र सांगळे दीनानाथ सांगळे मोहन तेलंग मालोजी कदम ग्रा.सदस्य दिगंबर तेलंग यशवंत तेलंग रावसाहेब शिराळे बाबाराव शिराळे पांडुरंग कदम यांच्या सह गावातील गावकरी व बाहेरून आलेले यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित होते कुस्त्यांच्या खंडात बंदोबस्तासाठी पवार साहेब कानगुले साहेब यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा