maharashtra day, workers day, shivshahi news,

सहकार शिरोमणी कारखाना ऊसास प्रतिटन देणार रु.2511 दर - पहिला हप्ता 2300/- चेअरमन, कल्याणराव काळे

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या 11 साखर पोत्याचे पुजन

sahakar shiromanni, sugar factory, Rate of Rs.2511 per ton, kalyanrao kale, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर 

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 मध्ये उत्पादित झालेल्या पहिल्या 11 साखर पोत्याचे पुजन पंढरपूर - सांगोला मतदार संघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सांगोल्याचे नगरसेवक संजय देशमुख, सांगोला पंचायत समिती सदस्य मेटकरी, पंढरपूर काँग्रेस आय कमिटीचे शहराध्यक्ष ॲङ राजेश भादुले उपस्थित होते.

यावेळी कल्याण काळे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या कष्टाचे दाम देण्यास सहकार शिरोमणी कारखाना कधीही मागे राहणार नाही, चालु गळीत हंगामामध्ये सहकार शिरोमणी कारखान्यास गळीतास येणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.2511/- दर देण्यात येणार असून, पहिला हप्ता रु.2300/- देणार आहे. सदर ऊसाची बिले दर पंधरवड्यात शेतकऱ्यांच्या खातेवर जमा करण्यात येणार आहेत. तसेच ऊस पुरवठादार शेतकरी सभासद यांना वर्षातुन एकदा प्र.कि.रु.27/- सवलतीच्या दरामध्ये प्रत्येकी 50 किलो साखर दोन दिवसात वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.

ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना मागील दोन-तीन हंगामामध्ये बँकांकडून अर्थ सहाय्य न मिळाल्यामुळे तसेच बँकाकडून ओटीएस अंतर्गत मिळालेल्या 40 कोटीच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी बँकांना वेळेत हप्ते भरावे लागत असल्यामुळे ऊसाची बिले देण्यास विलंब झाला. मात्र चालु सिझनमध्ये बँकाकडून कर्ज उपलब्ध्‍ होत नसल्यामुळे साखर व इतर व्यापाऱ्यांकडून निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी, तोडणी वाहतुकदार यांची बिले वेळेत देण्यात येणार असल्याची ग्वाही काळे यांनी दिली. तसेच कारखान्यातील सर्व मशिनरी देखभाल दुरुस्ती व आवश्यकते बदल इ. कामेही चांगली झाली आहेत.

चालु सिझनमध्ये सुमारे 4000 ते 4200 दैनंदिन गळीत करण्यात येणार असून सुमारे 6.00 लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट् ठेवण्यात आले आहे. यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासदांनी आपला संपुर्ण ऊस कारखान्यास देवुन सहकार्य करावे असेही सांगितले. सदर प्रसंगी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाळवणीच्या माळराणावर हा कारखाना उभारण्यासाठी स्व्.दादांनी किती कष्ट् घेतले हे सांगुन स्व्.दादांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकार धोरणात्मक निर्णय घेत असून, एक्स्‍पोर्ट साखरेचे धोरणा वरही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या केंद्र व राज्य्‍ सरकार हे शेतकऱ्याचे हिताचे निर्णय घेणारे सरकार असून, यापुढे शेतकऱ्यांना व कारखानदारीस चांगले दिवस येणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी सर्व पक्षातर्गत मतभेत विसरुन सर्वाना एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच ऊस वाहतुकीस येणारी रस्त्याची अडचण व अपघात टाळण्यासाठी पंढरपूर-सांगोला विधानसभा मतदार संघातील असणाऱ्या साखर कारखान्यांना ऊस वाहतुक होणारे सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येतील तसेच सहकार शिरोमणी कारखान्यास येणाऱ्या अडचणी निसंकोचपणे कल्याणराव यांनी माझ्याकडे मांडाव्यात त्या शासनाकडून पुर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल असेही सांगितले.

यावेळी यशवंतराव चव्हाण ना.सह.पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी ना.सह.पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, मा.पंचायत समिती सदस्य्‍ सुरेशबापु देठे, श्रीविठ्ठल कारखान्याचे संचालक समाधान काळे, माजी संचालक महादेव मल्लिकार्जुन देठे, जयसिंह देशमुख, चांगदेव कदम, सहकार शिरोमणीचे माजी संचालक महादेव देठे, पांडुरंग कौलगे, काका म्हेत्रे, ईस्माईल मुलाणी, राजसिंह माने तसेच नारायण गायकवाड, अरुण बागल तसेच सहकार शिरोमणी कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे, मा.व्हा.चेअरमन मारुतीदादा भोसले, संचालक सर्वश्री मोहन नागटिळक, बाळासाहेब कौलगे, गोरख जाधव, बिभिषण पवार, भारत कोळेकर, आण्णा शिंदे, राजाराम पाटील, दिनकर कदम, दिनकर चव्हाण, ॲङ तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, प्रदिप निर्मळ, युवराज दगडे, योगेश ताड, इब्राहिम मुजावर, नागेश फाटे, कार्यकारी संचालक झुंजार आसबे व कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी ऊस उत्पादक सभासद शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत संचालक सुधाकर कवडे यांनी केले तर आभार योगेश ताड यांनी मानले.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !