सोलापूर जिल्हा सोसायटीच्या नूतन संचालकांचा सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
खर्डी तालुका पंढरपूर येथील पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे (थोरात गट)अध्यक्ष दत्तात्रय येडगे यांनी शिक्षक मित्र परिवारातर्फे सोलापूर जिल्हा सोसायटी नूतन संचालक रामभाऊ यादव ,शेखर कोरके,राणीताई व्हनमाने यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सन्मान केला.
यावेळी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष नागनाथ क्षीरसागर, आदर्श शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब मिसाळ, शिक्षक पती-पत्नी संघाचे अध्यक्ष विजय लोंढे यांच्यासह शिक्षक बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी क्षिरसागर सर, मिसाळ सर, धुमाळ सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कार प्रसंगी बोलताना नूतन संचालकांनी आपल्या मनोगतामध्ये प्रामाणिकपणे काम करून सभासदांचे हित जोपासले जाईल याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चंदनशिवे यांनी केले तर आभार भोसले सर यांनी मांडले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा