maharashtra day, workers day, shivshahi news,

कारखाना शेतकरी हितासाठीच काम करणार असून या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देणार - आ समाधान आवताडे

 कारखाना प्रशासन व शेतकी विभागाच्या अथक प्रयत्नामुळे दोन महिन्यात साखर पूजन शक्य

The factory will work only for the benefit of farmers, Awatade Sugar and Distilleries Pvt. Lee., mla samadhan autade, mangalwedha, shivshahi news

आवताडे शुगर च्या पहिल्या ११ साखर पोत्याचे पूजन करताना आमदार समाधान आवताडे माजी सभापती प्रदीप खांडेकर, बाजार समिती सभापती सोमनाथ आवताडे,कार्यकारी संचालक मोहन पिसे,मुख्य कार्यकारी अधिकारी कूर्मदास चटके आदी मान्यवर

आवताडे शुगरच्या पहिल्या ११ साखर पोत्याचे पूजन संपन्न

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा

आवताडे शुगर अँण्ड डिस्टिलरीज प्रा. ली. नंदूर या साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामातील पहिल्या ११ साखर पोत्यांचे मार्गदर्शक आमदार मा. समाधानदादा आवताडे व कार्यकारी संचालक मा. मोहन पिसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार आवताडे यानी आवताडे शुगर हा कारखाना ताब्यात आल्यापासून कारखाना हा प्रतेक विभागीतील अधिकारी, कर्मचारी यांनी दिवसरात्र काम करून दोन महिन्यात हा कारखाना गळपास तयार केला व त्यास सक्षम अशी शेतकी विभागाने ही कमी कालावधीत वाहतूक यंत्रिणा उभी केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते भव्य दिव्य मोळीपूजनाचा कार्यक्रम घेऊ शकलो.

आज तयार झालेली ११ पोती हे कामगार व कारखाना प्रशासनाच्या अथक परिश्रमाचे फळ असल्याचे आ. आवताडे यांनी सांगीतले. तसेेच आवताडे शुगर हा कारखाना शेतकरी हितासाठीच काम करणार असून या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देण्यात येईल त्याचबरोबर उसाच्या वजनामध्ये कोणतीही तफावत दिसुन येणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उसाला शेतकऱ्यांचे समाधान होईल असा दर देणार असल्याचेही आ आवताडे यांनी नमुद केले. 

यावेळी साखर पूजन कार्यक्रमावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, माजी पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, भाजपाचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, दामाजीचे माजी मिस्टर संचालक भारत निकम, जगन्नाथ रेवे, ब्रह्मदेव रेवे, सचिन शिंदे, कारखान्याचे वर्क्स मॅनेजर दिलीप जाधव, चीफ केमिस्ट मोहन पवार कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !