एकूण ३०,७८,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला
![]() |
वाळू उपश्याचे संग्रहित छायाचित्र |
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर.
दिवसेंदिवस वाळू माफियांचे प्रस्थ वाढत असून प्रशासनाची डोकेदुखी बनले आहेत. निर्ढावलेले वाळू माफिया कोणताच कायदा, पर्यावरण, मानायला तयार नाहीत. फक्त पैसे मिळवणे एवढा एकच हेतू ठेवून चालणारा वाळूमाफियावर अंकुश ठेवणे गरजेचे बनले आहे. पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या कारवाईत गेल्या पाच दिवसांत पाच गुन्हे नोंद झाले आहेत. पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडून मागील पाच दिवसा पासुन मौजे देगाव, मुडेवाडी, चळे, तावशी येथे अवैध वाळू वाहतूक होत असलेल्या ठिकाणी छापा टाकून दोन ट्रॅक्टर व दिड ब्रास वाळू व तीन पिकअप व दोन ब्रास वाळु असे एकूण ३०,७८,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला.
०१) पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ६६३ / २०२२ भादवि कलम ३७९, ३४ व गौण खनिज कायदा कलम ४ (१), ४ (क), (१), २१ प्रमाणे दाखल गुन्हयात मौजे देगाव, ता. पंढरपूर शिवारातील आठ खोल्या ति-हे मार्ग सोलापुर रोडवर अवैध वाळू वाहतूक चालु असलेल्या बाबत गोपणीय बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून छापा टाकूण ५,०८,०००/- किं.चा एक लाल रंगाचा बीगर नंबरचा स्वराज्य ८५५ कंपनीचा हेड व त्याचे मागील बिगर नंबरची डंपींग ट्रॉली व त्यात रु.८,०००/- किं. ची एक ब्रास वाळु किं.अं. असे एकूण ५,०८,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आल्याने अज्ञात चालक व मालक यांचे विरुद्ध वरील प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
०२) पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ६९७ / २०२२ भादवि कलम ३७९, ३४ व गौण खनिज कायदा कलम ४ (१), ४ (क), (१), २१ प्रमाणे दाखल गुन्हयात मौजे मुंढेवाडी, ता. पंढरपूर शिवारातील भिमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करुन ती पिकअपच्या सहायाने वाहतुक करून भरून वाळू चोरी चालु असल्याचे गोपनीय माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावून छापा टाकूण ६,०४,०००/- किं.चा एक बिगर नंबरचा पाढ-या रंगाचा टाटा योद्धा कंपनीचे पिकअप व त्याचे पाठीमागी हौदयात अर्धा बास वाळु किं.रु. ४,०००/- किं.अं. असे एकूण ६,०४,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आल्याने अज्ञात चालक व मालक यांचे विरुद्ध वरील प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
०३) पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ६९८ / २०२२ भादवि कलम ३७९, ३४ व गौण खनिज कायदा कलम ४ (१), ४ (क), (१), २१ प्रमाणे दाखल गुन्हयात मौजे मुंढेवाडी, ता. पंढरपूर • शिवारातील भिमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून ती पिकअपच्या सहायाने वाहतुक करून भरून वाळु चोरी चालु असल्याचे गोपनीय माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावून छापा टाकूण ५,५८,०००/- किं. चा एक एम. एच १३ आर ५७६५ महेन्द्रा मॅक्स कंपनीच पिकअप व त्याचे पाठीमागी हौदयात एक एक ब्रास वाळु किं.रु. ८,०००/- किं. अं. असे एकूण ५,५८,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आल्याने अज्ञात चालक व मालक यांचे विरुद्ध वरील प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
०४) पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ७१३ / २०२२ भादवि कलम ३७९, ३४ व गौण खनिज कायदा कलम ४ (१), ४ (क), (१), २१ प्रमाणे दाखल गुन्हयात मौजे चळे, ता. पंढरपूर शिवारातील दर्लिंग मदीरा जवळ भिमा नदी पात्रात अवैध वाळू वाहतूक चालु असलेल्या बाबत गोपणीय बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून छापा टाकूण ६,०४,०००/- किं.चा एक लाल रंगाचा बीगर नंबरचा महेन्द्रा अर्जुन कंपनीचा मॉडेल नंबर ६०५ डी आय व्ही २ असा असेलेला सिरअल नंबर एन. पी. एच. के ००१६६ के.व्ही मागील बिगर नंबरची डंपींग ट्रॉली व त्यात रु.४,०००/- किं.ची अर्धा ब्रास वाळु किं.अं.. असे एकूण ६,०४,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आल्याने अज्ञात चालक व मालक यांचे विरुध्द वरील प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे
०५) ७१४/२०२२ भादवि कलम ३७९, ३४ व गौण खनिज कायदा कलम ४ (१), ४ (क), (१),२१ प्रमाणे दाखल गुन्हयात मौजे तावशी, ता. पंढरपूर शिवारातील मान नदीपात्रातुन अवैधरित्या वाळु उपसा व साठा करुन ती पिकअपच्या सहायाने वाहतुक करून भरून वाळु चोरी चालु असल्याचे गोपनीय माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावून छापा टाकूण ८,०४,०००/- किं. चा एक आशोक लिलॅन्ड बदामी रंगाचा पिकअप व त्याचे पाठीमागी हौदयात एक अर्धा ब्रास वाळु किं.रु. ४,०००/- किं.अं. असे एकूण ८,०४,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आल्याने अज्ञात चालक व मालक वाळू भरणारे असे सहा इसमा विरुद्ध वरील प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक मा शिरीषजी सरदेशपांडे साहेब, अपर पोलीस अधिक्षक श्री. हिंमतराव जाधव सो, मा. श्री. विक्रम कदम सो., उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर व पोलीस निरीक्षक, श्री. मिलींद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, पोकों २५ भराटे, पोका २१९६ कदम, पोहेकॉ १०५४ शिंदे, पोहेकॉ १५३८ चंदनशिवे, पोना १७९७ शिंदे, पोहेकॉ १०४ शिंदे, पोना १५२७ गायकवाड यांनी केली असून सदर बाबत पाचही गुन्हीची फिर्याद पोकॉ २५ हनुमंत गोरख भराटे यांनी दिली असुन सदर गुन्हयांचा पुढील तपास पोहेकॉ १७४३ चवरे, पोहेकॉ १०७ जलवडे, पोहेको १०४ शिंदे, पोना १७९७ शिंदे, पोना १६९८ आटपाडकर हे करीत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा