पंढरपूर तालुका व ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही इन्स्टॉल
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य सरकारच्या शासकीय निधीतून पोलीस ठाणे येथे सीसीटीव्ही इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत.
राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही लावण्यात यावेत अशी मागणी करणारी याचिका मा. उच्च न्यायालया समोर आली होती. त्या याचिकेच्या सुनावणी नंतर मा. उच्च न्यायालयाने राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये शासकीय खर्चातून सीसीटीव्ही लावण्यात यावेत असा आदेश राज्याचा पोलीस विभागाला दिला होता. त्यानुसार राज्य सरकारच्या निधीतून राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे काम सुजाता कम्प्युटर पुणे या एजन्सी सह आणखी दोन एजन्सींना दिले आहे.
त्यानुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांमध्ये काही पोलीस ठाण्यांमध्ये मागील काही दिवसांपासून सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार काल पोलीस ठाणे पंढरपूर तालुका व पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. पोलीस ठाणे पंढरपूर तालुका येथे १० कॅमेरे व पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे १० कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
सदरची यंत्रणा २४ तास ३६५ दिवस कार्यरत राहणार आहे. मुख्य विद्युत प्रवाह खंडित झाला तरी त्यास सपोर्ट करणारी यूपीएससी यंत्रणा लावण्यात आलेली आहे. सदरच्या सीसीटीव्ही फुटेचे रेकॉर्डिंग एक वर्षापर्यंत साठवले जाणार आहे. सदरचे सीसीटीव्ही हे उच्च दर्जाचे व आधुनिक तंत्रज्ञानतील आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे नागरिकांना देण्यात येणारी पोलीस सेवा हि अधिक पारदर्शी व कार्यक्षम होईल अशी अपेक्षा आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा