शिवशाही विशेष
रस्त्याने जाताना एखादी चिकन विक्रीचे दुकान असेल तर त्याच्या आसपास कोंबडीची पिसं पडलेली आपल्याला हमखास दिसतात या पिसांमुळे परिसर गलिच्छ होतो आणि दुर्गंधी सुटते परंतु ही घाणेरडी वाटणारी आणि वाया जाणारी पिसं तुम्हाला करोडपती बनू शकतात असे जर कोणी म्हटले तर तुम्ही त्याला वेड्यातच काढाल पण हे अगदी 100% खरं आहे
टाकाऊतून टिकाऊ असं नेहमी बोलले जातं पण हे बोल प्रत्यक्षात उतरवलेत जयपुर च्या मुदिता आणि राधेश यांनी राधेश अग्रहारी आणि मुदिता श्रीवास्तव हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्ट अँड डिझाईन, जयपुर या संस्थेत शिकत असताना कचऱ्याचे व्यवस्थापन याबाबत त्यांना एक प्रोजेक्ट करायचा होता राधेश यांनी कोंबडीच्या वाया जाणाऱ्या पिसांपासून काही करता येईल का? याबाबत संशोधन सुरू केले राधेशचे कुटुंब शुद्ध शाकाहारी असल्याने या कामासाठी त्यांना घरच्यांचा नेहमीच विरोध झाला त्याचबरोबर ते गलिच्छ पिसांवर संशोधन करीत असल्याने त्यांचे शिक्षक सुद्धा त्यांच्यावर नाराज होते
कोंबडीच्या पिसांपासून काही बनू शकते ही संकल्पनाच नवीन असल्याने राधेश यांना याबाबत काही पुस्तकं किंवा इंटरनेटवर फारशी माहिती मिळाली नाही मात्र त्यांना मुदीता श्रीवास्तव यांनी साथ दिली आणि त्यांनी सतत आठ वर्षे संशोधन करून कोंबडीची पिसं स्वच्छ करून त्यापासून धागा करण्याचे तंत्र विकसित केले त्यानंतर त्यापासून कापड तयार करू लागले
हे कापड पारंपारिक लोकर किंवा कापूस यापासून बनवलेल्या कापडापेक्षा वजनाला हलके मात्र जास्त उबदार आणि किमतीला स्वस्त असल्याचे राधेश सांगतात कोंबडीच्या पिसापासून बनवलेली एक शाल एका लहानशा अंगठीतून पार जाऊ शकते इतके हे कापड मुलायम आहे
मुदिता अँड राधेश प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांनी सुरू केलेली कंपनी आज वर्षाकाठी अडीच करोड रुपयाची उलाढाल करते गेल्या दोन वर्षात सात कोटींचा व्यवसाय करणारी त्यांची ही कंपनी फक्त 16000 रुपयात सुरू केली होती परिसरातील बाराशे लोकांना ही कंपनी रोजगार देत असून त्यांनी बनवलेल्या मालाला परदेशात खूपच मागणी आहे
मुदिता आणि राधेश यांचे हे कष्ट लोकांना रोजगार देत आहेत स्वतःही पैसे कमवत आहेत त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या कोंबडीच्या पिसांसारख्या कचऱ्याचा सदुपयोग करून मानव जातीच्या उत्कर्षालाही हातभार लावत आहेत त्यांच्या या कार्याला शिवशाही न्यूज नेटवर्कचा सलाम
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा