ज्ञानमंदिरातील नंदादीप' या कादंबरीला तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचे ग्रामीण साहित्य घरोघरी पोहोचले आणि ज्यांच्या मराठी साहित्याचा लौकिक महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेर झाला, असे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या 'ज्ञानमंदिरातील नंदादीप' या कादंबरीला तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर झालेला आहे.
कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, राजर्षी शाहू महाराज व्यासपीठ येथे दिनांक ३० आक्टोबर २०२२ रोजी रविवारी अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनामध्ये प्राचार्य शिवाजीराव बागल यांना डॅा ज्ञानेश्वर मुळे,श्री दि बा पाटील प्राचार्य एन आर भोसले इत्यादी मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आले
प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या साहित्याला यापूर्वी विविध ठिकाणचे पुरस्कार व सन्मान प्राप्त झालेल असून प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या कादंबरीस हा मानाचा समाजाला जाणारा पुरस्कार मिळाला असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी साहित्यिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा