maharashtra day, workers day, shivshahi news,

चेअरमन अभिजीत पाटलांचे कल्याणराव काळे यांच्या चंद्रभागा कारखान्यावर लक्ष - चंद्रभागेच्या संचालकांच्या हस्ते विठ्ठलच्या साखर पोत्यांचे पूजन

गळपाचे उद्दीष्ट पुर्ण होण्यासाठी विठ्ठल कारखान्याला ऊस द्यावा - चंद्रभागेचे संचालक दिनकर कदम आवाहन

vitthal sugar, abhijit patil, sahakar shiromani sugar factory, kalyanrao kale, election, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर 

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सन२०२२- २३ चे गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या पहिल्या ११ साखर पोत्याचे पुजन चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक इस्माईल मुलाणी, कालिदास पाटील, ज्ञानोबा कराळे, मधुकर नाईकनवरे, बिभिषण पवार, हनुमंत सुरवसे, बाळासाहेब कौलगे, आशिष यादव, दिनकरबापू कदम, दिनकर चव्हाण, पंढरीनाथ लामकाने, महादेव नाईकनवरे, , नामदेव ताड, सुभाष भोसले, अँड. सारंग आराध्ये, एच.एम. बागल व भिमराव रोंगे यांचे शुभहस्ते व विठ्ठल चे अध्यक्ष अभिजीत आबा पाटील, मार्गदर्शक बब्रुवाहन रोगेसर व व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील म्हणाले की, कारखान्याकडे चालू गळीत हंगामासाठी ३५ हजार एकर क्षेत्राची ऊसाची नोंद झालेली असून त्यापासून अंदाजे १२ ते १५ लाख मे. टन गाळप होणार आहे. त्याकरिता कारखान्याने सक्षम ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभी केलेली आहे. कारखान्याचे गाळप व्यवस्थितरित्या सुरु झाले आहे. निवडणूकीमध्ये वचन दिल्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही सर्व दिलेल्या शब्दांचे पालन केलेले आहे व येथून पुढेही पालन करु. तसेच थकीत ऊस बील दिले व सभासदांची दिवाळी गोड व्हावी याकरिता बाहेरील कारखान्याची साखर उपलब्ध करून दिवाळी साखर वाटप ही केले. सभासदाच्या आर्शीवादांमुळे सत्तेवर आलेपासून अवघ्या १५ दिवसामध्ये कारखाना चालू केलेला आहे. ऊस हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना २५००रू. भाव देऊन ऊस कुठेही काटा करून आणावा असे जाहीर अवाहन देखील चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे.

कारखाना चालू करणेसाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक, वर्क्स मैनेजर, चिफ केमिस्ट व सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेवून कारखाना चालू केलेला आहे व आज पाडव्याच्या मुहुर्तावरती पहिल्या ११ साखर पोत्याचे पुजन संपन्न झाले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे कौतुक केले. संचालक मंडळाने ठेवलेल्या ऊस गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करणेसाठी सभासदांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस श्री विठ्ठल कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. कारखान्याकडे नोंदलेल्या सर्व ऊसाचे आम्ही गाळप करणार असल्याचे सांगितले.

स्वागत व प्रस्ताविक प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांनी केले. सदर प्रसंगी कार्यलक्षी संचालक श्री तुकाराम मस्के सर, माजी नगराध्यक्ष श्री सुभाष भोसले, चंद्रभागा कारखान्याचे माजी संचालक इस्माईल मुलाणी, मधुकर नाईकनवरे, चंद्रभागा कारखान्याचे संचालक श्री दिनकरबापू कदम,श्री किरण घोडके, श्री.लवटे, अॅड. सारंग आराध्ये यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश मुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोडले, तसेच प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड व सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचितक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

vitthal sugar, abhijit patil, sahakar shiromani sugar factory, kalyanrao kale, election, shivshahi news


करखाना चालवणारा माणूस अभिजीत पाटीलांवर चंद्रभागेच्या संचालकांची भावना
कारखाना चालवणारा माणूस म्हणून श्री विठ्ठल कारखाना दोन वर्षापासून बंद असलेला विठ्ठल कारखान्याचे यशस्वी गाळप सुरू देखील केले. चंद्रभागेच्या आजी माजी संचालकांच्या हस्ते विठ्ठलचे साखर पोती पूजन म्हणजे विठ्ठल जिंकला आता चंद्रभागेच्या तयारी अशी चर्चा आता पंढरपूर तालुक्यात रंगताना दिसत आहे. विठ्ठल परिवारा मध्ये पंढरपूर तालुक्यात तीन साखर कारखाने असून चंद्रभागेची येत्या काही दिवसांत निवडणूकीचे बिगूल वाजणार आहे. तरी चेअरमन अभिजीत पाटील यांनी चंद्रभागेच्या संचालकांकडून विठ्ठल कारखान्याचे साखर पोती पूजन केल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असून आता निवडणूकीत पाटील हे काय भुमिका बजावणार याकडे पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !