सरकारी कामात अडथळा ; तलाठी व कोतवाल यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली होती
शिवशाही वृत्तसेवा सोलापूर
बेकायदा मुरूम वाहतूक दारावरती शासकीय कार्यवाही करीत असताना, तलाठ्याला मारहाण केल्याप्रकरणी तिघांची जिल्हा व न्यायाधीश व्ही.एच. पाठवदकर यांनी निर्देश मुक्तांना केली.
अतुल चौगुले, बालाजी खुर्द, अमोल चौगुले (सर्व राहणार. कोंडी, ता. उत्तर सोलापूर ) असे निर्दोष झालेल्यांची नावे आहेत. तिघेजण धीरज गावच्या शिवारातून रॉयल्टी न भरता मुरूम घेऊन जात होते. तेव्हा नंदिनी मदनवाले यांना आढळून आले. कारवाई करण्यासाठी तिघांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना तिघांनी रस्त्यामध्ये तलाठी व कोतवाल यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली होती. याप्रकरणी पाच साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ऍड एम.ए. इनामदार ,ऍड .वसीम डोंगरी यांनी काम पाहिले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा