नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच विविध विकास कामे
शिवशाही वृत्तसेवा, बार्शी
बार्शी शहरातील विविध प्रभागातील रस्ते , खकीकरण, डांबरीकरण करणे, कॉंक्रिटीकरण करणे, आरसीसी गटारी बांधणे, आधी कामांसाठी नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून चार कोटी तीन लाख सात हजार 479 रुपयांच्या प्रस्ताविक कामासाठी निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
मागील पाच वर्षाच्या काळामध्ये शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. त्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच विविध विकास कामे केली आहेत. बार्शी शहरातील प्रभाग क्रमांक एक 14, 15, 16, 17 व 20 येथील कामे करण्यासाठी बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेतला आहे.
लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन त्या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा