maharashtra day, workers day, shivshahi news,

ऐन सणात ही बंदोबस्ताचे काम : सर्वसामान्यांच्या आनंदातच पोलिसांची दिवाळी

दिवाळीसाठी इतरांना मिळाला बोनस , पोलिसांना मात्र पगारच ॲडव्हान्स !

maharashtra police, diwali, bonus , shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा सोलापूर

कायदा  - सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दिवस रात्र बंदोबस्ताचे काम करणाऱ्या पोलिसांना दिवाळी बोनस मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दिवाळी काळात मात्र ॲडव्हान्स म्हणून थोडी रक्कम पोलिसांना दिली जाते, रात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना तीही मिळत नसल्याची माहिती एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यात पोलीस बांधव दिवस - रात्र एक करतात. पोलिसांच्या अविरत सुरक्षा सेवेमुळे सर्व नागरिक सणासुदीच्या दिवसात सुट्टी घेऊन कुटुंबीय तसेच मित्रमंडळी सह आनंदाचे क्षण अनुभवतात. पोलीस बांधव आपल्यापैकीच आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल, हे एक समाज म्हणून विसरूनच गेलोय. गेल्या अनेक वर्षापासून साथ चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी. पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी, अशी मागणी आम्ही ठाकरे यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

यांना मिळतोय बारा हजार पाचशे रुपयांचा ॲडव्हान्स

पोलिसांना दिवाळीत बोनस दिला जात नाही. फक्त बारा हजार पाचशे रुपये ॲडव्हान्स दिला जातो. तोही पोलीस नाईक, पोलीस शिपाई सहाय्यक पोलीस, निरीक्षक सहाय्यक पोलीस, उपनिरीक्षक यांनाच मिळतो दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बोनस किंवा ॲडव्हान्स मिळत नसल्याची माहिती देण्यात आली.


अमित ठाकरे यांचे फडणवीस यांना पत्र
राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राज्यातील पोलीस बांधवांना दिवाळी बोनस जाहीर करावा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. किमान पंचवीस हजार रुपये बोनस देण्याची मागणी होत आहे.

साडेतीन हजार पोलिसांचा ताफा

सोलापूर ग्रामीण पोलीस दलात साडेतीन हजारहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यात पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, यासह पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल अशा विविध पदावर पोलीस कार्यरत आहेत.

जिल्ह्यात 26 पोलीस ठाणे

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत 26 पोलीस ठाणे व अन्य पोलीस स्टेशन व दुरक्षेत्र पोलीस केंद्र कार्यरत आहेत. सोलापूर तालुका, मंद्रूप, वळसंग पोलीस ठाणे शहराच्या आसपास आहेत. तर बार्शी पंढरपूर सांगोला अक्कलकोट आधी तालुका पातळीवर स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यरत आहे.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !