सहकार शिरोमणी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
शिवषयी वृत्तसेवा, पंढरपूर
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची मा.अधिमंडळाची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर संस्थेचे अध्यक्ष कल्याण वसंतराव काळे यांचे अध्यक्षतेखाली खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न् झाली. सदर प्रसंगी श्रीविठ्ठल व सहकार शिरोमणी वसंतदाद काळे यांच्या प्रतिमेचे पुजन जेष्ठ सभासद भास्कर कोंडीबा बागल, गादेगांव व मसु दादु पुजारी, आंबे, व स्वैरी कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगेसर व कारखान्याचे संचालक मंडळ याचेहस्ते करण्यात आले. तदनंतर श्रध्दांजली ठराव कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी मांडला.
यावेळी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी आपले अध्यक्षीय भाषणात कारखान्याचे वार्षिक सभेस आलेल्या सर्व सभासद शेतकरी बांधवांचे आभार माणुन सहकार शिरोमणीच्या मागील हंगामामध्ये 146 दिवसामध्ये 436333 मे.टन ऊसाचे गाळप करुन 421500 क्वि. साखरेचे उत्पादन केले असून, 9.66 टक्के साखर उतारा मिळाला आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातुन 2 कोटी 73 लाख 65 हजार युनिट पैकी 1 कोटी 4 लाख 39 हजार युनिट कारखाना व डिस्टीलरीसाठी वापर करुन, 1 कोटी 26 लाख 40 हजार युनिट वीज निर्यात केली आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातुन 8 कोटी 70 लाखाचे उत्पन्न् मिळाले आहे. तसेच डिस्टीलरी प्रकल्पातुन 47 लाख 20 हजार ब.लि. उत्पादन होवुन 1 टन मळीपासून सरासरी 286.34 उतारा मिळाला असल्याचे सांगितले तसेच आज अखेर राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक योजनांची माहिती दिली.
गळीत हंगाम 2022-23 करीता 6.00 लाख मे.टन गाळप करण्याचे उद्दिष्ट् ठेवण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणुक मशिनरी आधुनिकीकरण व ॲटोमायझेशन केली आहे. त्यामुळे चालु गळीत हंगामामध्ये कारखाना पुर्ण क्षमतेने चालविणेत येणार असून, ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला संपुर्ण ऊस कारखान्यास गळीतास देवुन सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच सिझन 2021-22 मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचे एफआरपी प्रमाणे असणारी शेतकऱ्यांची बिले दिपावली पुर्वी देण्यात येणार असल्याचे सांगितले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार लक्ष्मण आसबे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेतील सर्व विषयाचे वाचन केले त्यास उपस्थित सर्व सभासदांनी आवाजी मताने मंजुरी दिली. कार्यक्रमास आलेल्या सर्व सभासद व मान्यवरांचे स्वागत कारखान्याचे तज्ञ संचालक नागेश फाटे यांनी केले.
याप्रसंगी कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन मारुतीदादा भोसले, संचालक बाळासाहेब कौलगे, मोहन नागटिळक, गोरख जाधव, बिभिषण पवार, भारत कोळेकर, आण्णा शिंदे, राजाराम पाटील, दिनकर कदम, दिनकर चव्हाण, ॲङ तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, प्रदिप निर्मळ, युवराज दगडे, योगेश ताड, इब्राहिम मुजावर अरुण बागल, मा.संचालक प्रताप म्हेत्रे, विठ्ठल कारखान्याचे मा.संचालक उत्तम नाईकनवरे, यशवंत सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, मा.चेअरमन महादेव देठे, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुत्र संचलन समाधान काळे यांनी केले तर सभेस उपस्थितांचे आभार संचालक सुधाकर कवडे यांनी मानले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा