खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस पंढरपूर ग्रामीण पोलिसांकडून अटक
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मौजे शिरढोन ता. पढरपुर येथे दि.26/09/2022 रोजी दुपारी 12/30 वा. दरम्याण सुवर्णा परमेश्वर भुसनर व त्यांचे पती परमेश्वर भुसनर दोघे रा. शिरढोण ता. पंढरपुर हे त्याचे गावठाणामधील घरी स्वच्छता करण्यासाठी मोटारसायकल वरुन गेले होते. तेथे सागर भिमराव शिंदे रा. शिरढोण ता. पंढरपुर हा तेथे आला त्याने सुवर्णा हिचे पती परमेश्वर भुसनर यांना मोटारसायकल लावणेचे कारणावरुन शिविगाळी करुन " तुला खल्लास करतो " असे म्हणुन त्याने त्याचे घरात जावुन घरातुन लोंखडी तलवार आणुन परमेश्वर भुसनर यांचे डोकीत, काणाच्या पाठीमागे डाव्या बाजुस व डोकीस उजवे बाजुस व हाताचे बोटावर वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन पळुन गेला होता. सदर घटणेबाबत फिर्यादी नामे सुवर्णा परमेश्वर भुसनर यांनी पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे फिर्याद दिल्याने पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं 435/2022 भा.द.वि. कलम 307,504,506 प्रमाणे आरोपी नामे सागर भिमराव शिंदे रा. शिरढोण ता. पंढरपुर यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपी हा गुन्हा घडले पासुन फरार झाला होता
त्याचे शोधकामी पोलीस पथक नेमण्यात आले होते. सदर गुन्हयातील आरोपी नामे सागर भिमराव शिंदे रा. शिरढोण ता. पंढरपुर याचा तांत्रीक विश्लेषन करुन शोध घेवुन त्यास दि. 29/09/2022 रोजी अटक करण्यात आली असुन सदर आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता सदर आरोपीची मा. न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी रिमांड सुनावली असुन सदर कालावधीत आरोपीकडुन गुन्हयात वापरण्यात आलेली तलवार जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव सोलापुर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढरपुर विभाग पंढरपुर, मा. पोलीस निरक्षक धनंजय जाधव पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे, सपोफों मारुती दिवसे, पोना सुरेश माळी यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे हे करीत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा