शेलपिंपळगाव ता. खेड येथे UDID कार्ड वाटप कॅम्प
शिवशाही वृत्तसेवा, खेड (पुणे)
दि १७ सप्टेबर ते २ ऑक्टोबर सेवा पंधरवडा साजरा होत आहे या सेवा पंधरवड्यामध्ये दिव्यांग बांधवांना UDID कार्ड वाटपासाठी पुणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कॅम्प आयोजित केले जात आहेत खेड पंचायत समितीमार्फत ही दिव्यांग बांधवांना UDID कार्ड वितरित करण्यासाठी कॅम्प आयोजित केले जात आहेत या अनुषंगाने आज दिनांक एक नोव्हेंबर 2022 रोजी खेड तालुक्यातील सेल पिंपळगाव या ठिकाणी कॅम्प आयोजित केला होता त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना खेड पंचायत समितीचे दिव्यांग कक्ष अधिकारी श्री एन. पी. कुलकर्णी यांचे हस्ते कार्डचे वितरण करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री श्रीनाथ लांडे हे उपस्थित होते .
यावेळी श्री कुलकर्णी यांनी दिव्यांगांच्या विविध योजनांची माहिती ही दिवंग्यांना दिली जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री प्रवीण कोरगंटीवार साहेब तसेच श्रीमती मोरे मॅडम ( वै .सा .का.) व गटविकास अधिकारी श्री अजय जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम अतिशय गतिमान करण्यात आली आहे . UDID कार्ड प्राप्त झाल्यामुळे दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळणे सोपे झाले आहे व त्या सर्व योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांनी घ्यावा असे आव्हान श्री कुलकर्णी यांनी केले
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा