maharashtra day, workers day, shivshahi news,

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात दिलेला शब्द पाळला

सन २०२१-२२ मधील ऊसाची संपुर्ण एफ.आर.पी. अदा - चेअरमन श्री. शिवानंद पाटील

damaji sugar, FRP  paid, chairman , shivanad patil, mangalwedha, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये गळीतास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफ आर पी जी उवरित रक्कम रु. ११०.८९ प्र.मे.टन प्रमाणे एकूण रक्कम रु.४.२७ कोटी संबंधीत शेतकऱ्यांचे धनश्री महिला पतसंस्था मंगळवेढा यांचे सर्व शाखातील खात्यावर वर्ग केले आहे. कारखान्याचे गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी दिलेल्या शब्दाप्रमाणे हंगाम सुरु करण्यापूर्वी मागील ऊस बिलाची एफ आर पी पुर्ण केली आहे. तरी सर्व ऊस उत्पादक सभासद शेतक-यांनी आपला ऊस दामाजी कारखान्यास देवून सहकार्य करण्याचे आवाहन चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

विद्यमान संचालक मंडळाने मागील हंगाम २०२१-२२ मधील हंगाम अखेरचे कालावधीतील कार्यक्षेत्रातील सभासद व कार्यक्षेत्रावरील गेटकेन शेतकयांचे संपूर्ण ऊसाचे बिल रु. २१००/ प्र.मे.टन प्रमाणे एकूण रक्कम रुपये ८ कोटी ७५ लाख धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळ व पतसंस्थेच्या सर्व शाखामध्ये यापूर्वीच वर्ग केले आहे. तसेच मागील गीत हंगामाचे उर्वरित ऊस तोडणी वाहतुक फालिरु. १,६४,३२,४००/- पापूर्वी जिजामाता महिला येथे संबंधीत ठेकेदाराचे खात्यावर जमा करणेत आले आहे. अशा प्रकारे मागील संचालक मंडळाचे काळात गळीतास आलेल्या कसाचे बिलापोटी यापूर्वी रु. २१००/- प्रमाणे राहिलेली बिले अदा केली आहेत, तसेच एफ.आर.पी. पूर्ण करण्यासाठी अरित ऊस बिल रु. ४.२७ कोटी शेतकऱ्यांच्या धनश्री पतसंस्थेतील बँक खात्यावर वर्ग केले असलेचे व्हाइस चेअरमन श्री. तानाजी खरात यांनी सांगीतले.

सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वच कारखान्यांचा हंगाम सुरु करणेस विलंब होत आहे. अशा परिस्थितीत आपले कारखान्याची ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा सध्या कारखाना साईटवर आली असून शेती विभागामार्फत ऊसतोडणी प्रोगाम तयार केला आहे. आजपासून ऊसतोडणीच्या शेना देण्यात आल्या आहेत. तसेच कारखाना गळीतासाठी तयार असून उद्यापासून पुर्ण क्षमतेने नॉनस्टॉप कारखाना चालू करणार आहोत. या हंगामामध्ये ६.०० लाख मे.टन गाळपाचे संचालक मंडळाने उध्दीष्ट ठेवलेले आहे. मा.संचालक मंडळाने ठेवलेले उध्दीष्ट पुर्ण करण्यासाठी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उत्सुक असलेचे कार्यकारी संचालक श्री. सुनिल दळवी यांनी सांगीतले.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक श्री प्रकाश पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दलू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणु पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, ऊस उत्पादक सभासद शेतकरी तोडणी वाहतुक ठेकेदार, सिझन कामाचे कंत्राटदार, कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !