maharashtra day, workers day, shivshahi news,

राष्ट्रपिता म. गांधी जयंतीनिमित्त स्वेरीमध्ये नो प्रायव्हेट व्हेईकल डे साजरा

एन.एस.एस व मेसा तर्फे ‘सायकल रॅली’ संपन्न - प्रा.डॉ. बीपी रोंगे सरांची सायकल स्वारी

Gandhi Jayanti, No Private Vehicle Day, sveri, National Service Scheme, nss, Mechanical Engineering Students Association, mesa, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा,पंढरपूर

रविवारचा दिवस, साप्ताहिक सुट्टीचा! पण राष्ट्रपिता म. गांधी (mahatma gandhi )व लालबहादूर शास्त्री (lalbahaddur shastri) यांची जयंती, मग काय? स्वेरीमध्ये या निमित्ताने बौद्धिक व्याख्यानाची मेजवानीच असते ना! विद्यार्थी कसे चुकवतील? रविवारमुळे रस्त्यांवर वाहनांची वर्दळ जाणवत नव्हती! त्यातून स्वेरी परिवारातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आपल्या वैयक्तिक वाहनावर स्वार झाल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे आज स्वेरीमध्ये बहुतेक महापुरुषांची जयंती साजरी करणार नसावेत, अशी अनेकांची धारणा झाली. 

आज स्वेरीच्या कॉलेज बसेस वगळता स्वेरी संबंधित अन्य कोणतीही खाजगी वाहने रस्त्यावर धावत नव्हती. यावेळी ‘इंधन वाचवा आणि प्रदूषण थांबवा’ या उदात्त हेतूने स्वेरी अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजना (National Service Scheme) (NSS) व मेकॅनिकल इंजिनिअररिंग स्टुडंटस असोसिएशन (मेसा) (Mechanical Engineering Students Association) (MESA) तर्फे ‘सायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. गोपाळपुरात या रॅलीची तयारी सुरु होती. याच दरम्यान स्वेरीचे खुद्द संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सर हे रिद्धी सिद्धी मंदिराच्या बाजूने चालत येताना दिसून आले. अनेकांनी मोबाईलमध्ये हे दृश्य टिपले. सर्व खुलाशानंतर समजले की प्रतिवर्षी प्रमाणे आज स्वेरी ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ साजरा करत आहे. ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ च्या निमित्ताने डॉ. रोंगे सरांसह स्वेरीतील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी एक दिवस स्वतःच्या वाहनाना सुट्टी दिली. काहीजण बस, रिक्षाने तर काही प्राध्यापकांनी चक्क चालत कॉलेज गाठले, याचीच चर्चा आज पंढरी नगरीत होत आहे. 

गोपाळपुरचे उपसरपंच उदय पवार व माजी उपसरपंच विक्रम आसबे यांच्या हस्ते व गोपाळपूरमधील नागरिकांच्या उपस्थितीत ‘सायकल रॅली’चे उदघाटन करण्यात आले. या रॅली मध्ये पदवी व पदविका अभियांत्रिकी मधील विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकांनी सहभाग घेतला. श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर अंतर्गत असणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेसा (मेकॅनिकल इंजिनिअररिंग स्टुडंटस असोसिएशन) तर्फे आयोजिलेल्या अभियांत्रिकीच्या (पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी) विभागामधील जवळपास सर्वच सदस्यांनी ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ च्या निमित्ताने आपल्या खाजगी गाड्यांना विश्रांती दिली. ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ च्या निमित्ताने संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले ‘इंधन बचाव व पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ या अभियानाचे आयोजन केले होते. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्याबरोबर कांही प्राध्यापक, प्राध्यापिका सुरवातीला चालत तर नंतर सायकलवर कॉलेजला आले. 

यामध्ये डॉ.रोंगे यांच्यासह स्वेरीचे इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, डिप्लोमाचे प्राचार्य प्रा.डॉ. एन.डी. मिसाळ, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर, डॉ. विद्याराणी क्षीरसागर, प्रा. यशपाल खेडकर, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हे कॉलेज बसेसमधून आले. डॉ. सचिन सोनवणे, डॉ. रंगनाथ हरीदास, डॉ. प्रवीण ढवळे, प्रा. अविनाश पारखे, प्रा. राहुल नागणे, प्रा. प्रसाद जरे, प्रा. दिगंबर काशीद हे चक्क चालत कॉलेजला आले. या रॅलीमध्ये प्रथम क्रमांक ऐश्वर्या गुरव तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक प्रवीण कांबळे, द्वितीय क्रमांक अभिजित दिवे यांनी तर शिक्षकांमध्ये प्रा. प्रसाद जरे प्रथम तर प्रा. मनोज देशमुख यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. विजेत्याना गांधी जयंती निमित्त आलेले प्रमुख पाहुणे साहित्यिक प्रा. संजय सोनवणी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. दररोज खचाखच भरलेला स्वेरी परिसर आज वाहनांअभावी रिकामा दिसत होता तर कांही जागांवर सायकलींनी कब्जा केला होता. एकूणच स्वेरीच्या या ‘नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ चे गोपाळपूर व पंढरपूरकरांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !