विराट सोबत सेल्फी साठी राहुल राय ने मोजली विराट रक्कम
आपल्या आवडत्या खेळाडूंसाठीच्या त्यांनी हद्द ओलांडल्याच्या घटना अनेकदा पाहायला, वाचायला मिळतात. आता अशाच एका जबरा फॅनने विराट कोहली सोबतच्या सेल्फी साठी तब्बल 23 हजार 400 रुपये मोजले आहे. गुवाहाटीच्या शांतीपूर येथील राहुल रॉय या युवकाने विराट सोबत सेल्फी काढण्यासाठी ही किंमत मोजली.
भारतीय संघ गुवाहाटीला पोहोचल्यावर राहुल ला एअरपोर्टवर सुरक्षकांनी विराट सोबत सेल्फी काढण्यापासून रोखले होते. त्यानंतर या पठ्ठ्याने टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये थांबलीय तेथे चक्क रूम बुक केला. दुसऱ्या दिवशी त्याची कोहलीशी भेट झाली आणि ब्रेकफास्ट करताना सेल्फी घेता आला.
राहुल म्हणाला, मी विमानतळावर गेलो होतो. तेथे मला विराट कोहली दिसला परंतु सुरक्षा रक्षकांनी विराट जवळ जाऊ दिले नाही, पुढील काही दिवस विराट कोहली या शहरात आहे हे मला माहीत होते आणि त्यामुळे सराव सत्रात मी पुन्हा नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला; परंतु, येथेही सुरक्षारक्षकांनी हटकले.
मला माझ्या हिरो सोबत सेल्फी घ्यायची होती, त्यामुळे मी प्रयत्न सोडले नाही. मग मी शक्कल लढवली आणि भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये आहे, तिथे रूम बुक केली.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा