maharashtra day, workers day, shivshahi news,

शिवसेना (शिंदे गट) पंढरपूर शहर समन्वयक पदी महेश कदम यांची निवड

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी निवडी व विविध कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

shivsena, CM eknath shinde, pandharpur, mahesh kadaam, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर

शिवसेना (शिंदे गट) पंढरपूर शहर समन्वयक पदी महेश कदम यांची निवड झाली असून त्यांच्या निवडीचे पत्र शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत( सर )यांनी आज दिले. महेश कदम यांची निवड जाहीर केली.

महेश कदम शिवसेनेमध्ये मागील 25 वर्षापासून कार्यरत असून यापूर्वी त्यांनी शिवसेना पंढरपूर शहर उपशहर प्रमुख म्हणून काम केले होते. शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या उपजिल्हाप्रमुख पदी त्यांची निवड झाली होती. आता शिवसेनेच्या (शिंदे गट) शहर समन्वयक पदी त्यांची निवड झाली असून शहरातील सर्व स्तरात त्यांचे अभिनंदन होत आहे.

 यावेळी भैरवनाथ शुगरचे अनिल (दादा) सावंत ,पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख चरण राज चवरे ,उपजिल्हाप्रमुख महावीर (नाना) देशमुख, तालुकाप्रमुख शिवाजीराजे बाबर ,शहर प्रमुख मुन्ना भोसले ज्येष्ठ शिवसैनिक गंगाधर माने उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !