सैन्य दलांना एकूण 95 एलसीएच मिळणार
शिवशाही न्यूज वृत्त सेवा दिल्ली
स्वदेशी बनावटीचे 15 हलके लढाऊ हेलिकॉप्टर ( एलसीएच ) सोमवारी दिनांक तीन सैन्य दलात दाखल होतील. भारतीय हवाई दलाचा 90 वा स्थापना दिवस आठ ऑक्टोबरला आहे. त्यानिमित्त जोधपूर येथे औपचारिक रित्या दहा एलसीएचचा हवाई दलात समावेश करण्यात येईल. उर्वरित पाच लष्कराला दिले जातील. भारतीय सैन्य दलांना टप्प्याटप्प्याने एकूण 95 एलसीएच मिळणार आहेत.
लष्करी उड्डनाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल ए .के . सुरी यांनी बंगळूर येथील हिंदुस्थानात एरोनॉटिक्स लिमिटेड कडून पहिले एलसीएच मिळवले आहे. या 15 हेलिकॉप्टरच्या निर्मितीवर 885 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जोधपुर हवाई तळावर या हेलिकॉप्टरचा हवाई दलात समावेश करतील.एलसीएच सैन्य दलाला मिळाल्यानंतर दोन दशक जुनी मागणी पूर्ण होईल.
कारगिल मुळे भासली गरज
1999 मध्ये कारगिल युद्ध वेळी शत्रू उंचावर असल्याने या हेलिकॉप्टरची गरज भासली होती. 2015 मध्ये याची चाचणी घेण्यात आली. यावेळी हेलिकॉप्टरने वीस ते पंचवीस हजार फूट उंचीवर उड्डाण केले गेल्या वर्षी चीन सोबतच्या संघर्षादरम्यान हेलिकॉप्टर लदाखमध्ये तैनात करण्यात आले होते.
मिनिटाला 750 गोळ्या झाडण्याची क्षमता
अलीकडेच चीन सोबत एलएसीवर तणाव वाढला होता, तेव्हा या हेलिकॉप्टरची मोठ्या प्रमाणात चाचणी करण्यात आली होती. हिंदुस्थानात एअरोनाॅटिक्सने विकसित केलेले हेलिकॉप्टर अत्याधुनिक रडार वॉर्निंग सेन्सर्स, एमएडब्ल्यू तीनशे क्षेपणास्त्रे व एल डब्ल्यू एस 310 लेझर वॉर्मिंग सेन्सरने युक्त आहे. याशिवाय त्यात हेलिकॉप्टर लॉन्च केली ना रणगाडे विरोधी क्षेपणास्त्रे, चार फ्रान्स निर्मित हवेतून हवेत मारा करणारे एमबीडीए क्षेपणास्त्रे व चार रॉकेट पॅडस लावले जाऊ शकतात. या हेलिकॉप्टरची मशीन गन दर मिनिटाला 750 गोळ्या झाडू शकते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा