maharashtra day, workers day, shivshahi news,

घरांच्या किमती सामान्य माणसाला पडणाऱ्या ठेवा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बिल्डर्सना आवाहन

पोलिसांसाठी घरांना प्राधान्य देण्याकरता योजना तयार करण्यात येईल 

Keep housing prices affordable to the common man, Chief Minister Eknath Shinde's appeal to builders, shivshahi news

शिवशाही न्यूज वृत्तसेवा मुंबई

परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवित आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यवसायिकांनी पुढाकार घेऊन घरांच्या किमती परवडणाऱ्या ठेवाव्यात, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

' नारेडेको  'म्हणजे नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल तर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्सपो - 2022 चा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी समारोप झाला, त्यावेळी बोलत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, नारेडेकोचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप रुग्णवाल, नारेडेकोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निरंजन हरी नंदानी, राजन भालेकर, अभय चांडक उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. त्यातून सामान्याच्या घराचे स्वप्न साकारताना दिसून येत आहे. ही योजना राबवण्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. विकासकाने घरे बांधत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून पोलिसांना घरे द्यावीत असे सांगून पोलिसांसाठी घरांना प्राधान्य देण्याकरता योजना तयार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले


-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !