राजकीय नेते वेगळा विदर्भ देऊ शकत नाहीत : प्रशांत किशोर
शिवशाही वृत्तसेवा नागपूर
वेगळ्या विदर्भाचे राज्य राजकीय नेते देऊ शकत नाहीत. तेव्हा सत्तर वर्षांमध्ये काय झाले, कोण्या नेत्यांनी फसविले वगैरे गोष्टी सोडून द्या. आता हे आंदोलन थेट जनतेशी जोडायला हवे. त्यासाठी विदर्भातील सर्व व्यक्ती सोबत घेऊन त्यांच्या विचारांनी पुढचे पाऊले ठरवावी लागतील. आशा सूचना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी विदर्भवाद्यासोबतच्या बैठकीत दिल्या.
मिशन तीस राज्य विदर्भ अभियानात आता किशोर यांनी उडी घेतली आहे. गेले काही महिने त्यांची टीम विदर्भाची माहिती संकलित करीत आहे, कार्यकर्ते व लोकांशी संवाद साधत आहे, मंगळवारी चिकन 20 सेंटर मध्ये विदर्भवाद्याची बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले , स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा वाटतो तितका जटील नाही. राज्य होऊ शकते, हा विश्वास लोकांच्या मनात तयार झाला की ते होईल. वैधर्भीय जनतेने 70 वर्ष राजकीय नेत्यांवर विश्वास टाकला व त्यांनी स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकल्या. त्यातून स्पष्ट झाले की, नेते स्वतंत्र विदर्भ राज्य करू शकणार नाहीत. आंदोलनात सामान्य जनता उतरली तरच दिल्लीवर दबाव वाढेल.
जून 2023 पर्यंत दहा हजार सक्रिय कार्यकर्ते करून विदर्भ राज्य निर्मितीचे लक्ष आपण स्वीकारले आहे. त्यासाठी शक्ती व बुद्धी लागणार आहे. सुरुवातीला 50 लोकांची कार्यकारी समिती आणि नंतर प्रत्येक ग्रामपंचायत मधून किमान एक सदस्य अशा प्रकारे विदर्भातून दहा हजार सक्रिय कार्यकर्ते जोडल्यानंतर एक संयुक्त कृती समिती स्थापन केली जाईल. पुढच्या जून 2023 पर्यंत या कामाचा पहिला टप्पा असेल, असे किशोर यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा