पुणे व कोल्हापूर व सोलापूर येथील पन्नास अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी झाले
शिवशाही वृत्तसेवा पिंपरी
असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच त्यातून असंघटित क्षेत्रातून निर्माण होणारा रोजगार, त्याच्या अडचणी याची माहिती गोळा केली जाणार आहे. ही माहिती केंद्र सरकारला पुरवण्यात येणार असून, त्यातून असंघटित क्षेत्रासाठी योजना बनवण्यास मदत होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय, पुणे संचालक आणि क्षेत्रीय प्रमुख आलोक कुमार यांनी दिली.
असंघटित क्षेत्रातील माहिती संकलित करण्यासाठी आकुर्डी येथे सांख्यिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय, क्षेत्रीय संकार्य प्रभाग ( एफओडी ) प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्याकडून प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संचालक आलोक कुमार, उपसंचालक श्रीनिवास विजय यांच्या हस्ते झाले. यावेळी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे प्रादेशिक सहसंचालक हनुमंत माळी, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी पी. बी. पाटील, वरिष्ठ जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव आदी उपस्थित होते.
50 अधिकाऱ्यांचा प्रशिक्षणात सहभागअसंघटित उद्योग क्षेत्राचे वार्षिक सर्वेक्षण आक्टोंबर 2022 पासून सुरू होईल आणि ते एक वर्ष कालावधीचे आहे, ऑक्टोंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत टॅब्लेट वापरून डेटा संकलनाचे कार्य क्षेत्रीय कार्यालय, पुणेद्वारे केले जाईल. हे सर्वेक्षण केवळ उत्पादन, व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रातील असंघटित बिगर कृषी आस्थापनांमध्ये केले जाणार आहे. पुणे व कोल्हापूर व सोलापूर येथील पन्नास अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी झाले. शिबिर आयोजनात वरिष्ठ अधिकारी महेश चोरघडे महादेव कुलाल व आनंदसागर रोटे यांनी मेहनत घेतली---------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा