उस्मानाबादच्या गीताने घेतला टोकाचा निर्णय
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड
नांदेड मधील श्री गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या उस्मानाबादच्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने महाविद्यालयासह नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. नांदेड मधील श्री गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात ही घटना घडली. वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून गीता कदम नावाच्या विद्यार्थ्यांनीने आत्महत्या केली आहे मृत्यूपूर्वी तिने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. गीता कदम ही उस्मानाबाद (धाराशिव) येथील रहिवासी आहे. ती ही नांदेड मधील श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. याच वर्गात शिकणाऱ्या तिचा वर्गमित्र तिला नेहमी त्रास देत होता. त्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून गीताने अखेर हे टोकाचे पाऊल उचलले.
बुधवार दिनांक २१ सप्टेंबर पासून गीता गायब होती. गुरुवारी सकाळी तीचा मृतदेह महाविद्यालयाच्या वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने महाविद्यालयात एकच खळबळ उडाली, असून गीताने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून आपण ही आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे. विशेष म्हणजे ही सुसाईड नोट महिला आयोगाच्या नावाने असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कालपासून गायब असलेल्या या तरुणीने वसतिगृहाच्या एका खोलीत जाऊन ही आत्महत्या केल्याची माहिती प्राचार्यांनी दिली. याप्रकरणी नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तापस करत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा