हिंदू बंजारा चेतना परिषदेचा मेळावा
शिवशाही वृत्तसेवा अक्कलकोट
देशभरात बंजारा समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. हा समाज कष्ट करून स्वाभिमानाने जीवन जगणारा समाज आहे. काही धर्मातील लोकांनी पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणे सुरू केले आहे. त्या अमिषाला बंजारा समाजाने बळी पडू नये. बंजारा समाज हा हिंदू धर्मात जन्मलेला आहे. आहे त्या धर्मातच स्वाभिमानाने राहावे, असे आव्हान क्षेत्रीय प्रचारक शाम हरकरे यांनी केले.
हिंदू बंजारा चेतना परिषदेचे धर्म जागरण विभागाच्या माध्यमातून अक्कलकोट येथे मल्लिकार्जुन मंगल कार्यालयात मेळावा पार पडला. त्याप्रसंगी प्रचारक शाम हरकरे बोलत होते. व्यासपीठावर बंजारा चेतना परिषदेचे जिल्हाप्रमुख रवी पवार, महाराष्ट्र प्रांत प्रमुख पांडुरंग पवार, तालुकाध्यक्ष तुकाराम राठोड, लक्ष्मण महाराज, हेमंत हरारे, पुणे विभाग प्रमुख माधवराव खोत, पंढरपूर जिल्हा धर्म जागरण प्रमुख देवानंद कोकाटे, धर्म जागरण सोलापूर जिल्हा प्रमुख प्रसाद हरकुड, दक्षिण सोलापूरचे प्रमुख सुभाष पवार, परियोजना सहप्रमुख प्रमोद चिंचुरे, जिल्हा बौद्धिक प्रमुख संतोष वगाले, महेश हिंडोळे, तम्मा शेळके उपस्थित होते.
यावेळी शाम हरकरे यांनी 25 ते 30 जानेवारी 2023 रोजी अखिल भारतीय बंजारा समाजाचे जळगाव जिल्हा,जामनेर तालुका गोंद्री तांडा येथे महा कुंभ मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी धनसिंग चव्हाण, पोमू राठोड, गोमसिंग राठोड, संदीप राठोड, रतन सिंग राठोड, गुरु मास्तर, रेवनसिद्ध राठोड, माणिक राठोड, प्रेम राठोड, भीमा नाईक, दगडू चव्हाण, पंडित चव्हाण, धीरू पवार, लखन राठोड, काशिनाथ राठोड - मोट्याळ उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वनाथ चव्हाण यांनी केले. आभार थावरू मास्तर यांनी केले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा