maharashtra day, workers day, shivshahi news,

भ्रष्टाचाराबाबत राष्ट्रवादीला शंभर टक्के गुण दिले पाहिजेत - केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन - बारामती - शिवशाही न्यूज

 भाजपला बारामतीत काम करण्याची मोठी संधी.

central minister, nirmala sirtaraman, sharad pawar, baramati, NCP, BJP, shivshahi news

शिवशाही न्यूज वृत्तसेवा बारामती

भाजप घराणे शाही आणि भ्रष्टाचारावर काम करीत आहे. यामुळे भाजपला बारामतीत काम करण्याची मोठी संधी आहे. घराणेशाहीचे परिणाम बारामतीला सांगण्यासाठी मी आले आहे. घराणेशाहीतून काका - पुतण्याचे राजकारण आणि त्यातून भ्रष्टाचार करण्यासाठी राष्ट्रवादीला शंभर टक्के गुण मिळाले पाहिजेत, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लगावला. येथील भाजप कार्यालय भेटीनंतर लोकसभा प्रवास योजना कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यापुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण देशाच्या समान विकासाचे ध्येय आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्याचा समसमान विकास करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामध्ये कोणतीही अट नाही. बारामती मात्र वेगळे चित्र दिसून येत आहे.

लोकसभा मतदारसंघात ठराविक भागाचा विकास केल्याचे दिसून येते. स्वतःला राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या पक्षाकडून भेदभाव नाव केला जातोय, तो अजिबात अपेक्षित नसल्याचे त्या म्हणाल्या. भाजप नेहमीच घराणेशाहीच्या विरोधात राहिला आहे. त्यामुळेच काँग्रेसची देशात अशी अवस्था झाली आहे, जी केवळ मतदारांनी केली आहे. आणखी किती दिवस काँग्रेसची ही अवस्था राहील हे सांगणे कठीण आहे. गेल्या साठ वर्षापासून काँग्रेसच्या गरीबी हटाव च्या घोषणा आपण ऐकल्या. प्रत्यक्षात त्यांनी सर्वसामान्य गरिबांनाच हटवले, संपवले. अमेठी मतदार संघात गेल्या साठ वर्षात न झालेला विकास प्रथमच होत आहे. भाजपचे चरित्र वेगळे असल्याचे त्या म्हणाल्या. बारामतीत आणखीन चांगले काम होऊ शकते. ईएमव्ही मशीन आल्यावर सर्व काही व्यवस्थित चालले आहे. मात्र, बोगस मतदान मिटवण्याचे प्रथम ध्येय भाजप कार्यकर्त्यांनी ठेवावे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, येथे कोणाला घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी खासदार सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. खासदार सुळे यांनी कोविड काळात मतदारसंघाकडे फिरकल्याच बारामतीच्या 41 गावांना निवडणुकीपुरतेच पाणी मिळते. इतर वेळी ही गावे तहानलेली असल्याची टीका कचरे यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष सतीश फाळके, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली.

बारामतीशी बांधिलकी निवडणुकीनंतरही
निसर्ग वातावरण चांगले असताना माझ्या दौऱ्यामुळे कारण नसताना वातावरण तापले आहे. माझ्या पक्षाचे काम करण्यासाठी मी आले आहे. मग काही जणांकडून या दौऱ्यावर टीका टिपणी कशासाठी करता, चांगले काम सुरू आहे, तर ते सुरू ठेवा.


बारामतीत भाजप मजबूत करणे हे आमचे ध्येय आहे. बारामतीची भाजी बांधिलकी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसेल, 2024 नंतर देखील ती कायम असेल, असा टोला सितारामन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला. बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या निर्मला सीतारामन यांनी सकाळी जेजुरी गडावर खंडोबाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जेजुरीत आयोजित कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दुपारी त्यांनी मोरगावला जाऊन मयुरेश्वराचेही आशीर्वाद घेतले. त्यावेळी त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.


-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !