मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीची बैठक
शिवशाही वृत्तसेवा मोहोळ
गेल्या पन्नास वर्ष स्वतःला मालक म्हणून घेणारी माणसे सुद्धा आज भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत; परंतु ऐनवेळी तालुक्यामध्ये गद्दारी होते. पुढील काळात पक्षांतर्गत कार्यक्रमासाठी आदेश येण्याची वाट न पाहता सर्वजण एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीची समर्थ बूथ अभियान सशक्तीकरणासाठी बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी, तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, संजय शिरसागर, जि. प. चे माझी बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, संजीव खिल्लारे, शहराध्यक्ष सुनील शिरसागर, माजी तालुकाध्यक्ष सतीश काळे, माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, अंकुश आवताडे, रमेश माने, सतीश पाटील, गणेश झाडे आदी उपस्थित होते.
यावेळी आ. सचिन कल्याण शेट्टी म्हणाले, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची भाजपमध्ये दखल घेतल्याशिवाय राहत नाही. मतभेद बाजूला ठेवून पक्षाचे काम करा, समर्थ बूथ अभियान प्रभावीपणे राबवून केंद्राने केलेल्या कामाची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवा, असे सांगितले. यावेळी प्रकाश घोडके, आप्पासाहेब बिराजदार, संतोष मोगले, लिंगा देव निकम, बाळासाहेब पवार, पांडुरंग बसूटे, सर्जेराव चवरे, शशिकांत गावडे, महेश सोहनी, मुजीप मुजावर, माऊली भगरे आधी उपस्थित होते.
पदाचा वापर पत्र घेऊन फिरण्यासाठी नकोकेवळ पदासाठी किंवा पत्र घेऊन मंत्रालयातून कामे करून घेण्यासाठी पक्षाचा वापर करू नका, अशा पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षात ठेवायचे का नाही याचा विचार करावा लागेल, असे सांगत येणाऱ्या सर्व निवडणुका पक्षाच्या चिन्हावरच लढविणार असल्याचे विजयराज डोंगरे यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा