सैराट फेम प्रिन्स सुरज पवार सह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
शिवशाही वृत्तसेवा करमाळा
मंत्रालयात नोकरीस लावतो म्हणून पैसे उकळल्या प्रकरणी सैराट फेम प्रिन्स उर्फ सुरज पवार यांच्यासह चौघांविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सैराट सिनेमा प्रिन्स ही भूमिका साकारणारा करमाळा तालुक्यातील पोपळज येथील रहिवासी सुरज पवारला अटक होण्याची शक्यता आहे.
सुरज ने नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप सध्या त्याच्यावर आहे. नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांना मंत्रालयात नोकरी देण्याचे आमिष दोघा जणांनी दिले होते. यासाठी पाच लाखाची मागणी ही त्यांच्याकडून करण्यात आली होती. नोकरी लागल्यावर तीन लाख, तर सुरुवातीला दोन लाख अशी त्यांची बोलणी झाली होती. पैशाचे पाकीट देण्यासाठी राहुरी येथे महेश गेला. तेव्हा त्यांना आपली फसवणूक होत असल्याची चाहूल लागली. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या सर्व प्रकरणात मोठे रॅकेट असल्याची माहिती समोर येत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा